दहीहंडी, गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा! (Gre...

दहीहंडी, गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा! (Greetings For Dahi Handi, Gopal Kala)


आज अत्यंत उत्साहाने साजरी करण्यात येणाऱ्या दहीहंडी महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुंबई-ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी फोडण्यास गोविंदा पथक सज्ज झाले आहेत, त्यांना बेस्ट ऑफ लक!
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने गोपाळकाला वाटण्यात येतो. या काल्यात पोहे, दूध, लोणी, दही, ताक यांचे मिश्रण असते.
भगवान श्रीकृष्णाने व्रजभूमीत गायी चारताना स्वतःची व सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून त्याचा काला केला व सर्वांसह खाल्ला. या परंपरेला अनुसरून गोकुळअष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.