१२ देशातील ३०० हून अधिक सौंदर्य साधनांचे भव्य प...

१२ देशातील ३०० हून अधिक सौंदर्य साधनांचे भव्य प्रदर्शन संपन्न (Grand Exibition Of More Than 300 Beauty And Wellness Brands From 12 Countries Was Inaugurated In Mumbai)

इटली, सिंगापूर, लास वेगास, बँकॉक आणि मुंबई येथील ५ लाखांहून अधिक व्यावसायिक आणि १० हजार प्रदर्शकांना व्यवसायाची विशेष साधने आणि नवीन नेटवर्किंग संधी देणारे व्यासपीठ म्हणून कॉस्मोप्रोफ या संघटनेची ख्याती आहे. त्यांच्या वतीने मुंबईत कॉस्मोप्रोफ २०२२, हे तिसरे पर्व भरले होते. त्यामध्ये १२ देशातील ३०० हून अधिक ब्रॅण्डसचे भव्य प्रदर्शन करण्यात आले.

इटली हा जगातील उत्कृष्ट सौंदर्य प्रसाधने सादर करणारा देश आहे. त्यांच्या ट्रेड एजन्सीने १५ कंपन्यांसह उपस्थिती लावली. त्यांच्यामार्फत मेड इन इटलीचे सौंदर्य साधनांचे उत्कृष्ट प्रस्ताव दिले. तसेच ऑस्ट्रेलियातील स्कीनकेअर, वेलनेस व न्युट्रास्युटिकल्स या नव्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व अद्‌भुत उत्पादने या प्रदर्शनात सादर करण्यात आली.

या संदर्भात भारतातील इन्फॉर्मो मार्केटस्‌चे व्यवस्थापकीय संचालक योगेश मुद्रास म्हणाले, ‘कॉस्मोप्रोफ इंडिया हा झपाट्याने विकसित होणाऱ्या सौंदर्य बाजारपेठेसाठी आदर्श बी २ बी कार्यक्रम आहे. जो देशभरातील प्रदर्शकांचे प्रतिनिधित्त्व करतो.’ यामध्ये कॉस्मोटॉक्स व कॉस्मो ऑनस्टेज सारख्या उच्च दर्जांच्या कार्यशाळांचा देखील समावेश होता. या प्रदर्शनाची सांगता कॉस्मोप्रोफ इंडिया ॲवॉडस्‌ने झाला. त्यात सर्वोत्कृष्ट उत्पादने, डिझाइन्स आणि नवकल्पनांना पारितोषिके देण्यात आली.