अमिताभ बच्चन यांना त्यांची मुलगी श्वेता आणि नात...

अमिताभ बच्चन यांना त्यांची मुलगी श्वेता आणि नात नव्या नंदा यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव (Grand daughter Navya Shares A Cute Post On Big B’s Birthday, Writes- ‘Tu Na Thakega Kabhi Na Rukega Kabhi’, Daughter Shweta Also Showers Love On Dad)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. मोठमोठे सेलिब्रिटी, लाखो चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर सुद्धा बिग बींना वेगवेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिल्या जात आहेत.

नात नव्या नवेली आणि मुलगी श्वेता बच्चन यांनीही बिग बींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा शुभच्छा देण्याचा अनोखा अंदाज चाहत्यांना खूप आवडला असून ते नव्याचे कौतुक करत आहेत.

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेताने वडिलांसोबतच्या लहानपणापासूनच्या आठवणींना उजाळा देत काही अनसीन फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये तिने तू झूम या गाण्याचे बोल लिहिले आहेत, सर्वात शेवटी शुभेच्छा देण्यासाठी, हॅप्पी बर्थडे टू माय ग्रँड ओल्ड मॅन असे लिहिले आहे. श्वेताच्या या पोस्टवर हृतिक रोशन, सोहा अली खानसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

श्वेताची मुलगी नव्यानेही आपल्या आजोबांसाठी वाढदिवसाचा एक सुंदर संदेश लिहिला आहे. नव्याने आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा आपल्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने  “तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ.” या ‘अग्निपथ’च्या  ओळी लिहिल्या आहेत. आणि सर्वात शेवटी “तुझ्यासारखं आजवर कोणी नव्हतं, ना होणार, हॅपी बर्थडे नाना.” असे लिहित शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिषेक बच्चन याने देखील ट्विटरवर एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे. अभिषेक आपली आई जया बच्चनसोबत केबीसीच्या सेटवर गेला आणि आपल्या वडिलांना त्याने सरप्राइज दिले. त्यावेळी त्यांनी स्क्रीनवर अनेक जुने फोटो दाखवले. ते पाहुन बिग बी सुद्धा भावूक झाले होते. तसेच केबीसीच्या सेटवर केक कापून बिग बींचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काल रात्री त्यांच्या मुंबईतील जलसा या बंगल्या बाहेर चाहत्यांची गर्दी जमा झाली होती. त्यावेळी बिग बींनी सुद्धा चाहत्यांना नाराज न करता बाहेर येऊन सर्वांच्या शुभेच्छा स्विकारत त्यांचे आभार मानले.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम