चाळ संस्कृतीमध्ये वाढलेला गोविंदा (Govinda’s Ch...

चाळ संस्कृतीमध्ये वाढलेला गोविंदा (Govinda’s Childhood Was Spent In This Chawl)

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेता गोविंदाला आज कोणत्याही प्रसिद्धीची गरज नाही. एकापेक्षा एक सरस चित्रपटांमधील त्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे आणि अप्रतिम नृत्यामुळे त्याने लोकांच्या मनात न पुसता येण्याजोगे स्थान निर्माण केले आहे. सातत्याने यशाची शिडी चढत या सुपरस्टारने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक संस्मरणीय चित्रपट दिले आहेत. पण आज तो जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी त्याला खूप कठीण परिस्थितीतून जावे लागले आहे. त्याच्या आत्तापर्यंतच्या या खडतर प्रवासातून बरंच काही शिकता येण्यासारखं आहे.

Govinda, Childhood, Chawl

अलिकडे, गोविंदाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या विरारच्या घरात दिसत आहे. तिथले त्याचे चाळीतले घर पाहून तो खूप भावूक होत आहे. माध्यमांशी बोलताना गोविंदा म्हणतो की, ‘माझा जन्म इथे झाला आहे.’ नेहमीप्रमाणे आपल्या यशाचे श्रेय आईला देताना गोविंदा म्हणतोय, ”आईच्या प्रार्थनेचा नक्की परिणाम होतो. मी जे काही झालो आहे ते माझ्या आईच्या आशीर्वादामुळे आहे.” तुम्ही देखील गोविंदाचा तो जुना व्हिडीओ पाहू शकता.

Govinda, Childhood, Chawl

गोविंदाचा हा व्हिडिओ नोटवायरल नावाच्या नेटकऱ्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये, गोविंदा त्याचा जन्म झाला त्या चाळीत आहे. जेव्हा तो तिथे पोहोचतो, तेव्हा हजारोंचा जमाव त्याच्याभोवती जमा होतो. तो सर्वांना मोठ्या प्रेमाने ऑटोग्राफ देतो. या व्हिडिओमध्येही, तो आपल्या यशामागे आईचे नाव घेत भावुक होताना दिसतो.

Govinda, Childhood, Chawl

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

गोविंदाचे वडील अरुण आहुजा हे त्यांच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेते होते आणि त्यांची आई निर्मला देवी एक अभिनेत्री आणि गायिका होती. अशा परिस्थितीत लोकांना असेही वाटते की, स्टार किड असल्यामुळे गोविंदाला सर्व काही सहज मिळाले असेल, पण तसे मुळीच नाही. तो आज जो काही आहे, तो फक्त आणि फक्त त्याच्या प्रतिभेमुळे आणि मेहनतीमुळे.

Govinda, Childhood, Chawl

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

वास्तविक गोविंदाच्या वडिलांनी एका चित्रपटाची निर्मिती केली होती. त्याने त्या चित्रपटात खूप पैसे गुंतवले होते, पण तो चित्रपट फ्लॉप झाला, ज्यामुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागला. परिस्थिती इतकी बिघडली होती की त्याला त्याचा कार्टर रोड बंगला विकावा लागला आणि विरार, उत्तर मुंबईत राहावे लागले, तेही चाळीत. विरारच्या चाळीत गोविंदा आपल्या कुटुंबासह राहत होता. त्या दिवसांत गोविंदाने स्वप्नातही विचार केला नव्हता की तो कधी या चाळीतून बाहेर पडू शकेल, पण ते घडले.