गोविंदाने आपली बायको सुनिताला महागडी BMW कार भे...

गोविंदाने आपली बायको सुनिताला महागडी BMW कार भेट दिली… तिची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल! (Govinda Gifts BMW Car To Wife Sunita, You Will Be Stunned To Know The Price)

उत्तरेकडे करवा चौथ हा सौभाग्यवतींचा सण मोठा मानला जातो. या दिवशी निर्जळी उपवास करून विवाहित स्त्रिया आपल्या पतीचे दीर्घायुष्य व निरोगी जीवनासाठी व्रत करतात. तेव्हा पतीदेव देखील आपल्या पत्नीला भेटवस्तू देतात. कालपरवाच झालेल्या करवा चौथ व्रताच्या दिवशी गोविंदाने आपली पत्नी सुनिता हिला महागडी बीएमडब्लू कार भेटीदाखल दिली. तिची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल!

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सुनिताला भेट दिलेल्या या नव्या मोटारगाडीची एक झलक गोविंदाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पेश केली आहे.

फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार गोविंदाने सुनिताला भेट दिलेली नवी कार याच महिन्यात बाजारात आली आहे. बीएमडब्लू ३ सिरीजमधील ही कार म्हणजे ग्रेन लिमोसिन आयकॉनिक व्हर्जन वाटते आहे. या कारची किंमत ६२ लाख ९६ हजार रूपये सांगितली जात आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

या कारसोबत सुनिताचा फोटो शेअर करून गोविंदा लिहितो – माझ्या सर्वाधिक प्रिय दोस्तासाठी, जो माझ्या जीवनातील प्रेम आहे. माझ्या दोन छान मुलांच्या आईला करवा चौथसाठी शुभेच्छा. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्यासाठी माझं प्रेम अथांग आहे. आज मी तुला एक छोटीशी भेट देत आहे. प्रत्यक्षात तू यापेक्षा अधिक देण्यायोग्य आहेस. लव्ह यू माय सोना!

सुनिता आहुजाने आपल्या इन्स्टाग्रामवर पती गोविंदा सोबत करवा चौथ साजरा करत असलेले फोटो शेअर केले आहेत.

गोविंदा- सुनिताचे लग्न १९८७ साली झाले होते. नर्मदा आणि यशवर्धन ही त्यांची २ मुले आहेत. दोघांनी आपले लग्न दडवून ठेवले होते. मुलीच्या जन्मानंतर ते उघड केलं.