अनन्या पांडे पेक्षाही अतिशय हॉट, स्टायलिश आणि ब...

अनन्या पांडे पेक्षाही अतिशय हॉट, स्टायलिश आणि बोल्ड आहे तिची आई भावना पांडे… (Gorgeous! Ananya Panday’s Mom Bhavna Pandey Is As Glamorous And Bold As Her Daughter Ananya)

अनन्या पांडे नेहमीच तिचं सौंदर्य आणि स्टाइलमुळे चर्चेत राहिली आहे. परंतु तिला हे सौंदर्य वारसा हक्काने मिळालं आहे, असं म्हणावयास काहीच हरकत नाही. कारण अनन्याची आई भावना पांडे ही लेकीपेक्षा अधिक बोल्ड आणि स्टायलिश आहे आणि हॉटनेसमध्येही आपल्या मुलीपेक्षा दोन पावलं पुढेच आहे.

काही दिवसांपूर्वी तिने ब्लिंग आउटफिटमध्ये ज्या काही पोझ दिल्या आहेत त्या अतिशय व्हायरल होत आहेत. तिने आपली लेक अनन्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात अनन्या पारदर्शक गाऊनमध्ये सगळ्यांना घायाळ करत आहे तरीही सगळ्यांच्या नजरा भावनाजींवर खिळल्या आहेत कारण भावनाही अनन्याला तोडीस तोड सुंदर दिसत आहे.

फिटनेसच्या बाबतही भावनाचं कौतुक करायला हवे. भावना तिचे थ्रोबॅक फोटोही नेहमी शेअर करत असते. आता ती एवढी फिट आणि सुंदर आहे मग जेव्हा ती तरुण होती तेव्हा तिच्या सौंदर्याची नुसती कल्पना करा. तिचे फोटो पाहिल्यास लक्षात येईल की, ती त्यावेळेस किती मॉडर्न आणि बोल्ड होती.

पती चंकी पांडेसोबतच्या फोटोंमध्येही भावना कमालीची हॉट दिसते आहे…

भावनाच्या फोटोंमध्ये तिची स्टाईल आणि फॅशन सेन्स पाहिल्यास तुम्ही अचंबित व्हाल.

आताही भावनाकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येणं शक्य नाही…