टीव्हीवरील गोपी बहू फेम देवोलीना भट्टाचार्जी या...

टीव्हीवरील गोपी बहू फेम देवोलीना भट्टाचार्जी या वादांमुळे होती चर्चेत (Gopi Bahu of TV Devoleena Bhattacharjee Came into Headlines Due to These Controversies Related to Her)

‘साथ निभाना साथिया’ या टीव्ही मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिने आपल्या लग्नाच्या विधींचे फोटो एकापाठोपाठ एक शेअर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

सुरुवातीला सर्वांना वाटले की तिने आपला को-स्टार विशाल सिंहसोबत लग्न केले आहे, मात्र नंतर तिने आपल्या पतीसोबतचे फोटो शेअर केले, तेव्हा तिने आपल्या जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत लग्न केल्याचे समोर आले. याआधीही ही अभिनेत्री अनेक वादांमुळे चर्चेत आली आहे.

शाहनवाज शेखसोबत लग्न करण्यापूर्वी देवोलीनाने सहकलाकार विशाल सिंगसोबत साखरपुडा केला असा दाखवणारा फोटो शेअर केला होता. त्यानंतर चाहत्यांनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर अभिनेत्रीने सर्वांची गंमत केल्याचे समोर आले. या अभिनेत्रीने स्वतः सांगितले की, विशालसोबतच्या माझ्या साखरपुड्याची बातमी ही केवळ गाण्याच्या प्रमोशनसाठी केलेली गंमत होती.

देवोलीना आपली को-स्टार नवलीन कौरसोबत झालेल्या भांडणामुळे खूप चर्चेत आली होती, याशिवाय देवोलीनाचे अभिनेत्री वंदना विठलानीसोबत झालेले भांडणही समोर आले होते, पण नंतर या अभिनेत्रीने तिच्यासोबतचे वाद मिटवले होते.

2016 मध्ये देवोलीनाने पेटाकडे अभिनेत्री उत्कर्षा नाईकने आपला कुत्रा गायब केल्याची तक्रार केली होती. देवोलीनाने आरोप केला होता की उत्कर्षा नाईकने माझा कुत्रा गायब केला आहे. या वादामुळे ती खूप चर्चेत होती.

देवोलिना भट्टाचार्जी बिग बॉसमध्येही दिसली होती. बिग बॉसमध्ये चुंबनाच्या वादामुळे देवोलीना खूप चर्चेत होती. याशिवाय सोशल मीडियावर निया शर्मासोबतच्या तिच्या वादांनीही लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. निया आणि देवोलीनाच्या भांडणाची बरीच चर्चा झाली.

 देवोलीनाची प्रतिमा प्रेक्षकांमध्ये सुसंस्कृत सून अशी आहे, पण जेव्हा तिने आपला बिकिनी लूक दाखवला तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले. सुसंस्कृत सुनेची प्रतिमा तोडून बिकिनी बेब बनल्याबद्दल या अभिनेत्रीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. लोकांनी तिच्यावर खूप टीका केली.