कॉमेडियन भारती सिंह आई होण्याच्या मार्गावर : वि...

कॉमेडियन भारती सिंह आई होण्याच्या मार्गावर : विनोदी पद्धतीने तिनेच केली घोषणा (Good News : Comedian Bharati Singh Is Pregnant: She Confirms Her Pregnancy)

मनोरंजन सृष्टीतून आणखी एक गोड बातमी मिळली आहे. टेलिव्हिजनवरील लाफ्टर क्वीन भारती सिंह आई होणार आहे. भारती सिंह गरोदर आहे आणि तिने स्वतःच एक व्हिडिओ शेअर करत नेहमीच्या विनोदी पद्धतीने आपल्या गरोदरपणाची घोषणा केली आहे.

Comedian Bharati Singh, Pregnant

भारतीने तिच्या गरोदरपणाची बातमी अतिशय मजेशीरपणे दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात ती प्रेग्नेंसीची तपासणी करत आहे आणि त्यानंतर आनंदाच्या भरात मोठ्याने ओरडत असताना दिसते आहे.

Comedian Bharati Singh, Pregnant

भारतीने सोशल मीडियावर जो व्हिडिओ शेयर केला आहे, त्यात ती बाथरूममध्ये बसलेली दिसत आहे. तिच्या हातात प्रेग्नंसी किट आहे. सुरुवातीला ती काहीशी त्रस्त दिसतेय, पण किट पाहिल्यानंतर तिला एवढा आनंद झालाय की, ती रिझल्ट पाहून भावूक झाली आहे. ‘गेल्या सहा महिन्यांपासून हा क्षण टिपूण ठेवण्यासाठी मी प्रयत्न करत होते आणि शेवटी आता तो क्षण आला. मी आई होणार आहे,’ असे तिने म्हटले आहे.

Comedian Bharati Singh, Pregnant

त्यानंतर भारती, हर्षला ही गुड न्यूज द्यायला जाते. हर्ष घरात झोपलेला असतो. हर्षचा आधी या बातमीवर विश्वास बसत नाही, भारती आपल्यासोबत गमंत करत असेल असं त्याला वाटतं, परंतु प्रेग्नंसी किट पाहिल्यानंतर त्याचा बायकोच्या बोलण्यावर विश्वास बसतो. व्हिडिओमध्ये भारती आनंदाच्या भरात नाचताना दिसत आहे.

Comedian Bharati Singh, Pregnant

भारतीने हा व्हिडिओ शेअर करत लिहिलंय, ‘हे आमचं सगळ्यात मोठं सरप्राइज.’ भारती आई होणार असल्याच्या बातमीस पुष्टी मिळताच सर्व चाहते आणि सेलिब्रिटीदेखील भारतीला शुभेच्छा देत आहेत. जीवनातील हा नवा प्रवास त्यांनी आनंदाने करावा यासाठी सर्वजण त्यांना शुभेच्छा देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुढील वर्षी एप्रिलपर्यंत भारतीच्या गरोदरपणाचा निकाल लागणार आहे.

Comedian Bharati Singh, Pregnant

सर्वप्रथम जस्मिन भसीनने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती, हर्ष, अली गोनी, पुनीत पाठक आणि त्याची पत्नी भारती बेबी बंपकडे बोट दाखवताना दिसत आहेत. या फोटोला तिने ‘बेबी लिंबाचिया लवकरच येत आहे’ अशी कॅप्शन दिली आहे. यानंतर अनेक सेलिब्रिटींनी फोटो पोस्ट करून भारतीचे अभिनंदन केले आहे.

Comedian Bharati Singh, Pregnant

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
भारती सिंगच्या प्रेग्नेंसीबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती. मात्र अद्यापपर्यंत भारतीकडून कोणतीही पुष्टी मिळालेली नव्हती. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी २०१७ मध्ये लग्न केले होते. अलीकडेच या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला.