अलविदा सिद्धार्थ शुक्ला! असा होता सिद्धार्थचा अ...

अलविदा सिद्धार्थ शुक्ला! असा होता सिद्धार्थचा अभिनयातील आत्तापर्यंतचा प्रवास… (Good Bye Sidharth Shukla… Gone Too Soon)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’ चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. अवघ्या चाळीसाव्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने सिद्धार्थचं निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली आहे.

Siddharth Shukla

असा होता सिद्धार्थचा आतापर्यंतचा प्रवास…

सिद्धार्थ शुक्ला, अलाहबाद, उत्तर प्रदेश येथील राहणारा होता. त्याने आपलं शालेय शिक्षण मुंबईच्या सेंट झेवियर्समधून केले आणि नंतर इंटिरियर डिझायनिंगमध्ये त्याने त्याचे ग्रॅजुएशन पूर्ण केले होते.

कॉलेजमध्ये असतानाच त्याने मॉडेलिंग सुरू केले होते. त्यावेळेस त्याने ‘ग्लॅडरेग्स मॅनहंट’ या शोमध्ये भाग घेतला आणि तो त्या शोचा रनर अप होता. २००५ साली सिद्धार्थ वर्ल्ड बेस्ट मॉडेल ठरला होता.

Siddharth Shukla

सिद्धार्थ फिटनेसबाबत अतिशय दक्ष होता. २०१५ मध्ये झालेल्या आठव्या जिओस्पा आणि एशियास्पा इंडिया अवॉर्ड्स मध्ये सिद्धार्थला ‘वेलनेस आयकॉन ऑफ द इयर’ अवॉर्ड देण्यात आला होता. तर सिद्धार्थाने नुकताच ‘सिन्थ ग्लोबल स्पा’चा फिट अँड फॅब अवॉर्ड देखील जिंकला होता.

Siddharth Shukla

२००८ सालामध्ये सोनी टी.व्ही.वरील ‘बाबूल का आंगन छूटे ना’ या मालिकेतून सिद्धार्थने करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने जाने पहचाने से, लव्ह यू जिंदगी, पवित्र रिश्ता अशा अनेक मालिकांतून अभिनय केला. परंतु त्यास फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.

नंतर २०१२ मध्ये कलर्स चॅनलवरील ‘बालिका वधू’ या मालिकेतील शिवराज शेखरच्या भूमिकेने सिद्धार्थला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली. तर ‘बिग बॉस १३’ मध्ये त्याने प्रेक्षकांचं मन जिंकत विजेतेपदावर नाव कोरलं.

Siddharth Shukla

२०१४ मध्ये आलिया भट्ट आणि वरुण धवन अभिनीत “हम्प्टी शर्मा की दुल्हनियां” या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय आणि त्यासाठी त्याला “बेस्ट ब्रेक थ्रू स्पोर्टिंग ॲक्टर” म्हणून स्टार डस्ट अॅवॉर्ड देखील मिळाला आहे.

सिद्धार्थने ‘सावधन इंडिया’ या क्राईमशोचं होस्टिंगदेखील केलं. तसंच ‘इंडियाज गॉड टॅलेंट’ या शोमध्ये देखील त्याने होस्टची भूमिका साकारली होती. सिद्धार्थने ‘खतरों के खिलाडी -७’ आणि ‘झलक दिखला जा’ या शोच्या सहाव्या पर्वातही भाग घेतला होता.

Siddharth Shukla

एकता कपूरच्या लोकप्रिय वेब शो ‘ब्रोकन बट बुटीफ्यूल-३’ मध्ये सिद्धार्थ चांगलाच गाजला. ‘बिग बॉस १३’नंतर सिद्धार्थ आणि शेहनाज गिलच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. दोघही एकत्रीत एका अल्बममध्ये झळकले होते. या अल्बमला चाहत्यांची पसंती मिळाली होती.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम