इटलीमध्ये आई अमृता सिंहसोबत सूर्यास्ताचा आनंद ल...

इटलीमध्ये आई अमृता सिंहसोबत सूर्यास्ताचा आनंद लुटताना दिसली सारा अली खान (Golden Hour: Sara Ali Khan Enjoys The Sunset In Florence, Italy With Mom Amrita Singh, See Pictures)

अभिनेत्री सारा अली खान अनेकदा सहलीवर जात असते. तिला भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडतेच शिवाय ती विदेशातही जात असते. सारा काही दिवसांपूर्वीच आपला भाऊ इब्राहिम अली खान आणि वडील सैफ अली खानसोबत लंडनला गेली होती. तिचे लंडनमधील मजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण यावेळी मात्र ती आपल्या आईसोबत म्हणजे अभिनेत्री अमृता सिंहसोबत इटलीला गेली आहे.

साराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर इटलीच्या फ्लॉरेन्स शहरातील फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती आपली आई अमृता सिंहसोबत सूर्यास्ताचा आनंद लुटताना दिसत आहे. साराने हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप घातला आहे आणि अमृता पांढऱ्या शर्टमध्ये दिसत आहे.

साराने या फोटोच्या कॅप्शनमध्ये चार्ल्स डिकन्सचे विचार शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्या शहर आणि निसर्गाबद्दल सुंदर वर्णन केले आहे. या फोटोंमध्ये आई आणि मुलीमधील घट्ट नातं स्पष्ट दिसत आहे. सारा अमृतासोबत फिरायला जाण्याची आणि तिच्यासोबत फोटो काढण्याची एकही संधी सोडत नाही.

साराने पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये ती इटलीतील सौंदर्य न्याहाळत आहे. मध्ययुगीन दगडांपासून तयार करण्यात आलेला आर्नो नदीवरील जुन्या पुलाजवळही साराने फोटो काढले आहेत. फोटोत साराने हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप आणि गडद गुलाबी रंगाची हॉट पॅण्ट घातली आहे. सोबतच तिने डोक्यावर कॅप घातली आहे आणि स्लिंग बॅग घेतली आहे. साराने सेलिब्रेटी स्टाइलिस्ट तान्या घावरीसोबत एक फोटो शेअर केला आहे. साराच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच गॅसलाइट या चित्रपटात दिसणार आहे. या व्यतिरिक्त ती विकी कौशलसोबत सुद्धा दिसणार आहे.