‘द कश्मीर फ़ाइल्स’चित्रपटाला गोवा फिल्म फेस्टिव...

‘द कश्मीर फ़ाइल्स’चित्रपटाला गोवा फिल्म फेस्टिवलमध्ये IFFI जूरी प्रमुखाने म्हटले अश्लील चित्रपट…प्रेक्षकांचा राग अनावर (Goa Film Festival: ‘The Kashmir Files’ Is Vulgar Propaganda, Says IFFI Jury Head, Israeli Ambassador Slams Jury Head, Deets Inside)

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये द कश्मीर फ़ाइल्स या चित्रपटावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. IFFIचे ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी या चित्रपटासाठी वादग्रस्त टिप्पणी केली आहे. जी कोणालाच आवडली नाही. लॅपिडने या चित्रपटाला अश्लील आणि प्रपोगंडा चित्रपट म्हटले आहे. त्यांनी या चित्रपटावर टीका करत हा चित्रपट अशा प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात दाखविण्यास योग्य नसल्याचे ते म्हणाले.

त्यांच्या अशा वक्तव्यामुळे लोक संतापले असून वाद आणखी वाढला आहे. अनुपम खेर, अशोक पंडित यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनुपम खेर म्हणाले की, खोट्याची उंची कितीही उंच असली तरी सत्याच्या तुलनेत ती नेहमीच लहान असते.

अशोक पंडित म्हणाले की, नदव लॅपिड यांनी द काश्मीर फाइल्ससाठी वापरलेल्या भाषेवर माझा तीव्र आक्षेप आहे. तीन लाख काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे चित्रण करणे अश्लील असू शकत नाही. एक चित्रपट निर्माता आणि काश्मिरी पंडित या नात्याने मी त्यांच्या लज्जास्पद विधानाचा तीव्र निषेध करतो.

याशिवाय अशोक पंडित यांनी इतर लोकांना आणि चित्रपट निर्मात्यांनाही एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, विवेक अग्निहोत्री यांनीही ट्विट म्हटले की, सत्य हे सर्वात धोकादायक असते आणि ते लोकांना खोटे बोलण्यास आमंत्रण देते.

या प्रकरणाला आता राजकीय स्वरूप आले आहे. भाजपचे विरोधक या चित्रपटाला मोदीजी आणि भाजपचा चित्रपट म्हणत लॅपिडचे समर्थन करत आहेत, तर काहीजण लॅपिडच्या विधानाला लज्जास्पद म्हणत आहेत.

भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलन यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नदव लॅपिड यांचे वक्तव्य वैयक्तिक असल्याचे सांगून लॅपिड यांच्या वक्तव्याची आम्हाला लाज वाटत असल्याचे म्हटले. ते म्हणाले की भारत आणि आम्ही मित्र आहोत कारण आमचे शत्रू एकच आहेत. भारताने आम्हाला येथे पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते, येथे पाहुण्यांना देव मानले जाते, परंतु तुम्ही भारताच्या विश्वासाचा आणि आदरातिथ्याचा गैरवापर केला आहे.