उरोजांची शोभा वाढवणारी ब्रा अशी निवडा (Glorify ...

उरोजांची शोभा वाढवणारी ब्रा अशी निवडा (Glorify The Beauty Of Your Breasts By Selecting A Proper Bra)

स्तनांचा आकार सुडौल ठेवण्यासाठी सोबतच शरीराच्या स्वास्थ्यासाठी साधारण किशोर वयापासूनच ब्रा वापरणे आवश्यक असते. मुलगी वयात येताच ‘ब्रा’ तिच्या आयुष्यात येते. ब्रेसिअर घट्ट बसते, घामाने रॅश येतात म्हणून ती नकोशी वाटत असली तरी ती गरजेची असतेच. मुलगी वयात येऊ लागली की सुरुवातीला आईच्या मदतीनेच ती ब्रा घालू लागते. पूर्वी कित्येक वर्षं मुली एकाच प्रकारची ब्रा वापरत असत. साईजच्या निवडीतसुद्धा अज्ञानामुळे काही चुका होत असत, अन् त्या दुर्लक्षिल्या जात असत. परंतु आता तुलनेत मुली अधिक सजग होऊ लागल्या आहेत. शिवाय कम्फर्टेबल व फॅशनेबल ठेवणारी ब्रा अनेक प्रकारातं त्यांना सहजपणे उपलब्ध होऊ लागली आहे. फक्त आपल्याला त्यातून आपल्यासाठी परफेक्ट ब्रा निवडता आली पाहिजे एवढेच.

Bra selection, ब्रा अशी निवडा, how to select bra

मुलगी वयात आली की तिच्या शरीरात होणार्‍या अनेक बदलांपैकी, मुख्यतः दिसून येणारा बदल म्हणजे स्तनांचे आकार. या बदलामुळे एका अर्थाने स्त्रीचे सौंदर्य अधिक खुलून येते. म्ह्णूनच स्तनांचा आकार सुडौल ठेवण्यासाठी प्रत्येक मुलगी प्रयत्न करत असते. सौंदर्यासोबतच शरीराच्या स्वास्थ्यासाठी देखील स्तनांची काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी सुरुवातीपासूनच म्हणजेच साधारण किशोरवयापासूनच ब्रा वापरणे आवश्यक असते.
पहिल्यांदा ब्रा घातल्यानंतर थोडे अवघडल्यासारखे वाटू शकते पण नंतर तुम्हाला ब्रा ची सवय होते. अलीकडे बाजारात अनेक फॅशनेबल ब्रा चे पॅटर्न आले आहेत. अनेकदा यातून योग्य निवड करणे म्हणजे मोठे टास्क बनून बसते पण तुमच्या साईजनुसार आणि कम्फर्टनुसार ही निवड करणे खूप महत्वाचे असते, अन्यथा याचे खूप गंभीर परिणाम देखील जाणवू शकतात. आज आपण असे काही नियम बघणार आहोत जे अवलंबून तुम्हाला तुमची ’द परफेक्ट’ ब्रा निवडताना मदत होईल.

Bra selection, ब्रा अशी निवडा, how to select bra

सर्वात महत्वाचे म्हणजे साधारणतः ब्रा चा आकार हा 28 इंचापासून सुरु होतो. आपल्या शरीराच्या अर्थात स्तनांच्या आकाराच्या मापाप्रमाणेच ब्रा घालावी. ब्रा अगदी घट्ट अथवा अगदी सैल असू नये.
ब्रा ऑनलाईन खरेदी करायची असल्यास आधीच आपला ब्रँड, साइज आणि प्रकार माहिती करून घ्या, कोणताही संभ्रम असल्यास सुरुवातीला दुकानातून किंवा मॉल मधून योग्य मदत घेऊन मगच ब्रा खरेदी करा.
स्तनांच्या खालच्या भागाचा आकार म्हणजेच ब्रा च्या बँडचा साईज तसेच कपचा आकार व साईज माहिती असणे गरजेचे आहे. सध्या बाजारात — (1/2 इंच) पासून सुरु होऊन ते ऊ म्हणजेच 4 इंचापर्यंत कप साईज उपलब्ध असतात.

Bra selection, ब्रा अशी निवडा, how to select bra

ज्या ब्रा तून आपले स्तन बाहेर निघत असतील अशी ब्रा खरेदी करणे टाळा. याऐवजी फुल कव्हरेज ब्रा चा पर्याय तुमच्या छातीला अगदी सर्व बाजूने कव्हर करणारा आणि उत्तम ठरतो.
ब्रा ची स्ट्रीप जर का लूज असेल तर सतत खांद्यावरून सरकत राहते, यामुळे तुम्हाला वावरताना त्रास होऊ शकतो. म्ह्णूनच या स्ट्रिप्स नीट घट्ट करून घ्या.
ब्रा विकत घेण्याआधी नेहमी ट्राय करून पाहा. अंगावर ब्रा घालताच पुढे व डाव्या- उजव्या दोन्ही बाजूस वाकून पाहा, जर का यावेळी तुमचे स्तन किंचितही बाहेर येत असतील तर ही ब्रा तुमच्यासाठी योग्य नाही.
ब्रा विकत घेतल्यावर वापरताना सुद्धा खास काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे एकच ब्रा सतत वापरू नका. दिवसाच्या अखेरीस झोपताना ब्रा घालून झोपू नका.
अलीकडे प्रत्येक गरजेनुसार बाजारात वेगवेगळ्या ब्रा उपलब्ध आहेत त्यामुळे सुरुवातीला तुमची गरज ओळखा मग निवड करा. ब्रा विभिन्न आकार आणि प्रकारामध्ये मिळते. ब्रा घालण्याची विविध उद्दिष्टं असतात आणि ती या वेगवेगळ्या ब्रामुळे पूर्ण होतात. प्रत्येक महिलेची शरीरयष्टी तसेच कपडे परिधान करण्याचा अंदाज वेगळा असतो, त्यामुळे त्यांच्या गरजाही भिन्न असतात. आउटिफिटला अनुसरून कोणती ब्रा निवडावी, हे जाणून घेण्यासाठी ब्राचे प्रकार पाहुया.
मॅक्सिमायजरही ब्रा पुश-अप, पॅडेड आणि अंडरवायर्ड असते. स्मॉल ते मिडियम साईजच्या महिला क्लीवेज आणि सपोर्टसाठी ही ब्रा वापरुन पाहू शकतात. ही ब्रा तुम्ही फॉर्मल, एथनिक, पार्टी वेअर ड्रेस सोबत घालू शकता.

Bra selection, ब्रा अशी निवडा, how to select bra

मिनिमायजर
ही फुल कप ब्रा असते, ज्यात पॅड असत नाही. मिडियम ते मोठी ब्रेस्ट साईज असलेल्या महिलांसाठी हा चांगला पर्याय आहे. ही ब्रा ब्रेस्टला लहान लूक देते. रोजच्या फॉर्मल व इनफॉर्मल ड्रेससोबत ही ब्रा वापरता येते.
अंडरवायर्ड
ही डेमी कप आणि पॅडेड ब्रा असते. छोटे आणि मिडियम ब्रेस्ट असलेल्या महिलांसाठी हा उत्तम पर्याय आहे. रोजच्या फॉर्मल व इनफॉर्मल ड्रेससोबत ही ब्रा वापरता येते. मात्र अंडरवायर्ड ब्रा काही तासांकरिताच घालावी, खूप वेळ घालून ठेवू नये.
टी-शर्ट ब्रा
या पॅडेड ब्रा च्या स्ट्रीप्स पारदर्शक असतात. छोटे आणि मोठे अशा दोन्ही बेस्ट साईजसाठी या ब्रा उपयुक्त असतात. जिम वेअर, टी-शर्ट, शीयर पार्टी वेअर सोबत ही घालता येते.

Bra selection, ब्रा अशी निवडा, how to select bra

स्पोर्ट्स ब्रा
ही नॉन पॅडेड आणि नॉन अंडरवायर्ड ब्रा असून, हिच्या स्ट्रीप्स रुंद असतात. ही ब्रा छोट्या आणि मिडियम ब्रेस्टसाठी उत्तम असते. मोठे ब्रेस्ट असलेल्या महिला एक्सरसाईज करताना आपल्या नॉर्मल ब्रा वर ही घालू शकतात. त्यामुळे ब्रेस्टला सपोर्ट आणि संरक्षण मिळू शकते.
मॅटर्निटी ब्रा
ही फुल कप आणि नॉन पॅडेड ब्रा असते. ही ब्रा विशेषतः स्तनपान करणार्‍या आईंसाठी बनवण्यात आली आहे. या ब्रामध्ये फ्लॅप अथवा ओपनिंग लेसदेखील असते जी स्तनपान करणार्‍या आईसाठी अतिशय सोयीस्कर असते. याचं कापड अगदी मुलायम असतं.
मल्टीवेअर ब्रा
ही ब्रा तुम्ही नॉर्मल स्ट्रीप्स, स्ट्रीप्स लेस, हॉल्टरनेक, क्रॉस स्ट्रीप्स आणि ऑफ शोल्डर अशा पाच तर्‍हेने वापरता येते. ही फुल कप, पॅडेड आणि अंडरवायर्ड ब्रा असते. मिडियम ते मोठ्या ब्रेस्टच्या महिलाही ही वापरु शकतात. पार्टी वेअर, फॉर्मल व ऑफिस वेअर सोबत ही ब्रा घातली जाते.
डेली वेअर ब्रा
ही ब्रा नॉन पॅडेड आणि फुल कप असते. अतिशय सोयिस्कर अशी ही ब्रा सर्वच महिला वापरु शकतात. रोजच्या कपड्यांसाठी ही वापरली जाते. पण ही पारदर्शक कपड्यांत वापरु नये.

Bra selection, ब्रा अशी निवडा, how to select bra

ट्यूब टॉप
ही ब्रा स्ट्रीप्सलेस आणि नॉन पॅडेड असते. लहान साईजपासून मिडियम ब्रेस्टच्या महिला ही घालतात. टी-शर्ट, जिम वेअर, स्ट्रेपलेस पार्टी वेअर सोबत ही ब्रा वापरता येते.
पुशअप ब्रा
या पॅडेड ब्रा स्ट्रीप्ससह असतात आणि स्ट्रीप्सलेस देखील असतात. ही ब्रा छोट्या आणि मिडियम बेस्ट असलेल्या महिलांसाठी ज्यांना क्लीवेजची गरज असते, त्यांच्यासाठी उत्तम असते. पार्टी ड्रेसमध्येही वापरतात.
ड्रेस अप ब्रा
ही ब्रा लेसी, डेमी-कप आणि नॉन पॅडेड असते. छोट्या आणि मिडियम ब्रेस्ट असलेल्या महिला ही वापरु शकतात. या ब्रामध्ये जास्त सपोर्ट नसतो त्यामुळे ही काही तासांकरिता घालण्यास ठीक आहे. तुम्ही ही ब्रा हनीमुन दरम्यान वा ड्रेसी फिलिंगसाठी घालू शकता.
डेमी-कप ब्रा
ही पॅडेड ब्रा अंडरवायर सपोर्टसह मिळते. छोट्या आणि मिडियम ब्रेस्ट असलेल्या महिला ही वापरु शकतात. रोजच्या फॉर्मल व इनफॉर्मल ड्रेससोबत ही ब्रा वापरता येते.
लक्षात घ्या, ब्रा ही नेहमीच आपल्या शरीराला बिलगून राहणारी वस्तू आहे त्यामुळे तिची निवड एकदम परफेक्ट असणे खूप गरजेचे आहे. पटतंय ना?

तुम्ही योग्य मापाची ब्रा वापरता का? (How To Choose The Right Bra, The Ultimate Guide To Choosing The Perfect Bra)