लॅक्मे फॅशन वीकमध्ये ग्लॅमरचा तडका (Glamour Gli...

लॅक्मे फॅशन वीकमध्ये ग्लॅमरचा तडका (Glamour Glitters In Lakme Fashion Week)

फॅशन जगतात प्रतिष्ठेचा मानला जाणारा एफडीसीआय एक्स लॅक्मे फॅशन वीक जोर धरतो आहे. या सोहळ्यात काबिया आणि साशा ग्रेवाल यांनी ज्वेलरी आणि ॲसेसरीज्‌चे वेगळे कलेक्शन सादर करून आपले नाव राखले.

काबिया आणि साशा या लक्षवेधी, चर्चिल्या जाणाऱ्या, आधुनिक ज्वेलरी सादर करण्यामध्ये प्रख्यात आहेत.

यंदाच्या फॅशन वीकमध्ये त्यांनी आपल्या आऊटहाऊस ब्रॅन्डचे डोपामाईन कलेक्शन सादर केले.

मोती, रेझिन्स, सीट बीडस्‌, राईनस्टोन, क्रिस्टल्स, इत्यादींनी बनविलेले गळ्यातील नेकलेस, अंगठ्या, ब्रोचेस आणि कंगन यांची अनोखी स्टाईल करून ग्लॅमरस्‌ ड्रेस घातलेल्या ललना रॅम्प वॉकवर दिमाखात चालल्या.