रेड कार्पेटवर मराठी अभिनेत्रींचे ग्लॅमर (Glamou...

रेड कार्पेटवर मराठी अभिनेत्रींचे ग्लॅमर (Glamour And Glitter Of Marathi Actresses On Red Carpet)

करोनाच्या काळात घरात बंदिवान झालेल्या समस्त लोकांना आधार होता तो टेलिव्हिजन वरील मालिकांचा. पण मालिकांचे सोहळे होऊ शकले नव्हते. आता वातावरण निवळल्याने सोहळ होऊ घातले आहेत.

कलर्स मराठीचा ‘रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा – कलर्स मराठी ॲवॉर्ड २०२१-२२’ नुकताच ठाणे येथील, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला. त्यामध्ये कलर्स मराठीच्या मालिकेतील जवळपास सर्वच कलाकारांनी हजेरी लावली.

विशेष म्हणजे या समारंभात रेड कार्पेटवर मराठी अभिनेत्रींनी आपल्या ग्लॅमरचे प्रदर्शन केले. फॅशनेबल ड्रेसेसमध्ये त्या आल्या होत्या.

या कार्यक्रमात पुरस्कार कोणी पटकावले, कोणी कोणत्या गाण्यावर डान्स केला; या गोष्टी २७ मार्चला सायंकाळी ७ वाजता कलर्स मराठी चॅनलवर पाहायला मिळतील.

या ॲवॉर्डस्‌ विजेत्यांमध्ये सुंदरा मनामध्ये भरली, राजा रानीची गं जोडी, जीव माझा गुंतला, लेक माझी दुर्गा, आई मायेचं कवच, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, या मालिकेतील कलावंत आहेत.