हिंदीतून मराठी मालिकेत पहिल्यांदाच आलेली ग्लैमर...

हिंदीतून मराठी मालिकेत पहिल्यांदाच आलेली ग्लैमरस् अभिनेत्री रीना मधुकर (Glamorous Bollywood Actress Enters In Marathi Serial)

Glamorous Bollywood Actress, Marathi Serial

‘मन उडू उडू झाल ‘ असं मजेदार शीर्षक असलेली मालिका झी टीव्ही वर सुरु झालेली आहे. या मालिकेचं वैशिष्ठ असं कि, हिंदी सिनेमा आणि टीव्ही वरील ग्लॅमरस अभिनेत्री रीना मधुकर हि पहिल्यांदाच मराठी मालिकेत आली आहे.

Glamorous Bollywood Actress, Marathi Serial


‘एजन्ट राघव क्राइम ब्रांच’ या मालिकेतून रीना फोरेइनसिक डॉक्टर च्या भूमिकेत तर ‘तलाश’ या हिंदी चित्रपटात ती पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत चमकली होती. ‘अजिंठा ‘ या ऐतिहासिक मराठी चित्रपटात रिनाने आदिवासी तरुणीची तर ‘३१ दिवस ‘ या चित्रपटात अंध मुलीची भूमिका साकारली होती.

Glamorous Bollywood Actress, Marathi Serial


अशा रीतीने हिंदी व मराठी चित्रपटसुष्टी तुन गाजलेली हि ग्लॅमरस अभिनेत्री आता ‘मन उडू उडू झाल ‘ या मालिकेतून नायिका ऋता दुर्गुळे हिच्या बहिणीची सानिका देशपांडेची भूमिका करत आहे.
आपला या मालिकेच्या अनुभवाबद्दल रीना म्हणते, ” माझी हि पहिली मराठी मालिका आहे. त्यामुळे मला मायेच्या, हक्काच्या घरी परत आल्या सारखे वाटत आहे. माझ्याच न्हवे तर जग भरातील मराठी प्रेक्षकांच्या घरी मी आली आहे. कारण ६ दिवस मी त्यांच्या घरातला एक भाग बनणार आहे.

Glamorous Bollywood Actress, Marathi Serial

दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. ऋता दुर्गुळे च काम मी पहिला होत. ते मला आवडल होत. तिच्या व इतर कलाकारांबरोबर काम करताना मजा येते. इथे सेट वरील वातावरण प्रसन्न, हलकंफुलकं आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम असं वाटत.”
रिनाने आपला सोशल मीडिया वरील वावर ग्लॅमरस ठेवला आहे. तिथे तिचे चाहते तिला पसंद करतात. त्यामुळे तिच्या या मालिकेबद्दल तिला हिंदी व मराठी सिनेमातील लोकांनी शुभेच्या दिल्या आहेत.