‘रंग माझा वेगळा’ मालिकेत जिनिलिया देशमुखची खास ...

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत जिनिलिया देशमुखची खास हजेरी (Gineliya Deshmukh Makes A Special Appearance In Marathi Serial ‘Rang Maza Vegla’)

‘रंग माझा वेगळा’ या स्टार प्रवाहवरील मालिकेने नुकतेच ९०० भाग पूर्ण केले आहेत. या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर असून दीपाविषयी कार्तिकच्या मनात असणारा गैरसमज लवकरच दूर होणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे कार्तिकच्या मनात असणारा हा गैरसमज दूर करण्यासाठी आणि निरपेक्ष प्रेमाचं महत्त्व पटवून देण्यासाठी जिनिलिया देशमुखची खास एण्ट्री होणार आहे.

रितेश आणि जिनिलिया देशमुखचा वेड सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. निरपेक्ष प्रेम म्हणजे वेड असतं. याच निरपेक्ष प्रेमाचं महत्त्व पटवून देणाऱ्या वेड या सिनेमाची सध्या कमालीची उत्सुकता आहे. वेड सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने जिनिलियाने महाराष्ट्राचा नंबर वन शो ‘रंग माझा वेगळा’ मध्ये हजेरी लावली.  जिनिलियासोबतचा हा भाग खास असेलच पण प्रेक्षकांना ज्या दिवसाची गेले कित्येक दिवस उत्सुकता होती तो दिवस अखेर आलाय.

कार्तिकने दीपाच्या चारित्र्यावर संशय घेऊन दोन्ही मुलींचा पिता होणं नाकारलं. दीपाला मुलीला वाढवताना बराच संघर्ष करावा लागला. मात्र कार्तिकला आता सत्य परिस्थितीचा उलगडा झालाय. त्यामुळे जाहीर माफी मागत तो सन्मानाने दीपाला पुन्हा घरी आणणार आहे. दीपा-कार्तिकच्या नात्याची नव्याने सुरुवात होणार आहे.