फक्त ६ रुपयांत ‘सेना जल’ विकत घ्या आणि भारतीय स...

फक्त ६ रुपयांत ‘सेना जल’ विकत घ्या आणि भारतीय सैनिकांच्या परिवारांस सहकार्य करा! (Get Sena Jal For Just 6 Rupees, Great Initiative By Army Wives)

तहान लागल्यानंतर आपण बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रँडेड वॉटर बॉटल्स अगदी सहज विकत घेतो. ज्या आपल्याला १५-२० रुपयांपर्यंत मिळतात. परंतु आता वॉटर बॉटल्समध्ये एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे, ज्यामुळे तहान तर भागेलच शिवाय भारतीय सेनेच्या हजारो कुटुंबांस आर्थिक मदत होणार आहे.

Picture Credit: Twitter

आर्मी वाइज्व वेलफेयर एसोसिएशनने (AAWA) अगदी माफक दरात ‘सेना जल’ नावाची वॉटर बॉटल नव्याने उपलब्ध केली आहे. सेना जलच्या या बॉटलची किंमत फक्त ६ रुपये असून या बॉटल्सच्या विक्रीतून जो नफा होईल तो सैनिक आणि युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींना खर्चासाठी देण्यात येणार आहे, असे एएनआयने आपल्या वृत्तात सांगितले आहे.

 Picture Credit: Twitter

आर्मी वाइज्व वेलफेयर एसोसिएशनच्या या उपक्रमाची सोशल मीडियावर लोकांकडून बरीच प्रशंसा केली जात आहे. एवढेच नव्हे तर सेना जल आम्हाला कोठे व कसे मिळेल अशाप्रकारचे प्रश्नही विचारले जात आहेत. आमच्या विभागात मिळेल का, आम्ही कुरिअरने मागवू शकतो का, असेही लोक विचारत आहेत. तेव्हा ही चांगली सुरूवात आहे असे म्हणावयास हरकत नाही

Picture Credit: Twitter

Picture Credit: Twitter
लोकांचा हा उत्साह खरोखर कौतुकास्पद आहे. परंतु तुर्तास तरी हे सेना जल सगळ्यांसाठी उपलब्ध नसून केवळ सैनिक, सेना कँटिंग आणि सेनेच्या कार्यक्रमांमध्येच उपलब्ध होणार आहे आणि त्यांनाच ही वॉटर बॉटल विकत घेता येणार आहे. बाजारात सगळ्यांसाठी ही उपलब्ध नाही आहे. बहुधा या उपक्रमाचा प्रतिसाद पाहिल्यानंतर सगळ्यांसाठी ते उपलब्ध होईल अशी आशा बाळगुया.
Picture Credit: Twitter/ANI