जेनेलिया देशमुखचे मराठीत पदार्पण : रितेश देशमुख...

जेनेलिया देशमुखचे मराठीत पदार्पण : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित (Genelia Deshmukh Makes Debut In Marathi Film : Poster Released Of ‘Ved’ Directed By Riteish Deshmukh)

वेडेपणा करायला मुहूर्त नसतो. पण केलेला वेडेपणा मुहूर्तावर जाहीर करायला काय हरकत आहे? – अशी घोषणा करून निर्माती जेनेलिया देशमुखने आपल्या ‘वेड’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले. त्यासाठी तिने व अभिनेता रितेश देशमुखने दिवाळी पाडव्याचा मुहूर्त गाठला.

‘वेड’ मधून जेनेलिया मराठी चित्रसृष्टीत पदार्पण करत आहे. तिने यापूर्वी हिंदी, तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम अशा ५ भाषेतील चित्रपटातून कामे केली आहेत. ‘वेड’ मध्ये जेनेलिया नायिकेच्या भूमिकेत असून तिचा नायक खुद्द रितेश देशमुख आहे. रितेश एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यानेच केले आहे.

मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचे संगीत अजय – अतुल यांनी दिले आहे. हा चित्रपट डिसेंबर महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित होईल.