गौतमी देशपांडेचा लूक एकदम कडक, एकदम सई… (Gautam...

गौतमी देशपांडेचा लूक एकदम कडक, एकदम सई… (Gautami Deshpande’s Authentic Marathi Look Photos Viral on Social Media)

झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतील बिनधास्त, हसरी, मनमोकळ्या स्वभावाची सई अर्थात अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गौतमी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते.

Gautami Deshpande, Authentic Marathi Look

नुकतंच गौतमीनं गुलाबी रंगाची साडी, क्रीमी ब्लाऊज आणि केसात मधे भांग पाडून केलेली केशभूषा व माळलेला गजरा असं फोटोशूट केलं असून; हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Gautami Deshpande, Authentic Marathi Look
Gautami Deshpande, Authentic Marathi Look

तिने आपल्या या फोटोंना ‘छबीदार सुरत देखणी, जणू हिरकणी नार गुलजार…’ अशी कॅप्शन दिली आहे. अभिनयासोबतच गौतमीला गाण्याचीही आवड आहे.  

Gautami Deshpande, Authentic Marathi Look

गौतमीचा हा छबीदार लूकचा चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. सध्या सोशल मीडियावर गौतमीच्या या सुंदर फोटोंची चर्चा सुरु आहे.

Gautami Deshpande, Authentic Marathi Look

(सर्व फोटो सौजन्य : गौतमी देशपांडे / इन्स्टाग्राम)