गौरी खान ते ट्विंकल खन्ना: या बॉलीवूड अभिनेत्री...

गौरी खान ते ट्विंकल खन्ना: या बॉलीवूड अभिनेत्रींनी त्यांच्या पतींना काही अभिनेत्रींसोबत काम करण्यास घातली होती बंदी (Gauri Khan to Twinkle Khanna: Bollywood Wives Who Allegedly banned husbands from working with certain actresses)

गौरी खान, ट्विंकल खन्ना, जया बच्चन यांसारख्या काही बॉलीवूड स्टार पत्नींनी आपल्या पतींना ठराविक काही अभिनेत्रींसोबत काम करण्यास मनाई केली होती. पाहुया या अभिनेत्री कोण होत्या, आणि त्यांना कोणत्या अभिनेत्रींचा मत्सर वाटत होता.

ट्विंकल खन्ना

ट्विंकल खन्नासोबत लग्न करण्याआधीही अक्षय कुमारची अनेक प्रेमप्रकरणे गाजली होती. त्यामुळे ट्विंकलने अक्षयच्या प्रेमात पडल्यानंतर लगेचच लग्नाची गाठ बांधली. लग्नानंतरही अक्षय कुमारला गमावण्याच्या भीतीने ट्विंकलने अक्षयला प्रियंका चोप्रासोबत काम  करण्यास बंदी घातली होती. एवढेच नाही तर तिने त्याच्या एका चित्रपटाचे शूटिंग देखील थांबवले होते.

सुझैन खान

काईट्स जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान हृतिक रोशन आणि बार्बरा मोरी यांच्यातील जवळीक चर्चेचा विषय झाली होती. तेव्हा वेळीच सावध होत सुझैन खानने तिच्या तत्कालीन पतीला हृतिकला बार्बरासोबत कधीही काम न करण्याचा इशारा दिला होता.

आलिया भट्ट

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ जे एकमेकांसोबत सौहार्दपूर्ण राहण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कदाचित पुन्हा स्क्रीन शेअर करणार नाहीत. कारण रणबीरची पत्नी आलिया भट्ट त्यांना तशी सहमती कधीच देणार नाही.

दीपिका पदुकोण

दीपिकाचा नवरा रणवीर सिंग याचे इंडस्ट्रीतील कोणाशीही अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहे परंतु त्याच्या प्रिय पत्नीस त्याने कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करणे कदाचित आवडणार नाही.

जया बच्चन

जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांना रेखासोबत काम करण्यापासून रोखले होते हे सर्वश्रूतच आहे. अर्थात अमितजींना तशी सक्त ताकीदच आहे, असे म्हणावयास वाव आहे.

कतरिना कैफ

कॅट आणि दीपिका पादुकोणमधील शीतयुद्ध जाणता, कतरिना कैफसोबत प्रेमविवाह करणारा विकी कौशल कदाचित दीपिका पादुकोणसोबत कधी काम करायला धजेल असे वाटत नाही.

गौरी खान

गौरी खान आणि शाहरुख यांचे किशोरवयीन प्रेम त्यानंतर लग्न मग मुलं असा गोडगोजिरा संसार असूनही गौरीला शाहरुखने प्रियंका चोप्रासोबत काम करणे पसंत नव्हते.  त्यामुळे सुपरस्टारचा डॉन 2  हा चित्रपट प्रियंकासोबतचा शेवटचा चित्रपट होता.