शाहरुखच्या या सवयीला वैतागते गौरी खान, ‘कॉफी वि...

शाहरुखच्या या सवयीला वैतागते गौरी खान, ‘कॉफी विथ करण 7’ मध्ये केला खुलासा(Gauri Khan Reveals An Annoying Habit Of Shah Rukh Khan During Parties, Will Make Some Shocking Revelation in Koffee With Karan 7)

बॉलिवूड निर्माता दिग्दर्शक करण जोहर आपल्या ‘कॉफी विथ करण’ या शोमुळे खूप चर्चेत असतो. या शोमध्ये अनेक कलाकार आपापल्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यातील किस्से सांगत असतात. सध्या या शोचा 7 वा सीजन चालू आहे. आता येणाऱ्या एपिसोडमध्ये शाहरुख खानची पत्नी गौरी खान येणार आहे.

गौरी तब्बल 17 वर्षांनी या शोमध्ये पाहुणी म्हणून येणार आहे. यापूर्वी ती 2005 मध्ये आलेली. गौरीसोबत यावेळी तिच्या जवळच्या मैत्रिणी महिप कपूर आणि भावना पाण्डे येणार आहेत. या शोमध्ये तिने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींसोबत शाहरुखच्या अशा काही सवयी सांगितल्या ज्याचा तिला खूप राग येतो.

शोमध्ये गौरी सांगते की, शाहरुख ऑनस्क्रीनप्रमाणेच ऑफस्क्रीनसुद्धा खूप जण्टलमन आहे. आमच्या घरात एखादी पार्टी असेल तर तो पार्टीला आलेल्या प्रत्येक पाहुण्याला त्यांच्या कारपर्यंत सोडायला जातो.

गौरी पुढे म्हणाली की, मला शाहरुखची ही सवय अजिबात आवडत नाही. कारण तो पूर्ण पार्टीभर पाहुण्यांना कारपर्यंत सोडायला जाण्याचे कामच करत असतो. मला तर वाटते की, पार्टीमध्ये तो घरात कमी बाहेरच जास्त असतो. त्यामुळे आलेले पाहुणे त्याला शोधत असतात. काही वेळा वाटते की, पार्टी घरात नाही तर बाहेर रोडवरच आहे. त्याच्या या सवयीचा मला खूप राग येतो.

या व्यतिरिक्त गौरीने आपले वैयक्तिक आयुष्य , मुलं, किंग खान यांच्यासंदर्भातही खूप गप्पा मारल्या. हा एपिसोड लवकरच टेलिकास्ट होणार आहे.