गौरी खानने आपली लेक सुहानाला दिल्या डेटिंग टिप्...

गौरी खानने आपली लेक सुहानाला दिल्या डेटिंग टिप्स (Gauri Khan Gives Dating Tips To Her Loving Daughter Suhana)

करण जोहरचा कॉफी विथ करण हा शो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतोच. या शो मध्ये इंडस्ट्रीतले अनेक कलाकार करणसोबत कॉफी प्यायला येतात. व ते या शोमध्ये इंडस्ट्रीतली तसेच आपल्या वैयक्तिक आयुष्यातली अनेक गुपिते सांगतात. सध्या या शोचा 7 वा सीजन सुरु असून यात आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकार येऊन गेले आहेत.

आता येणाऱ्या आगामी एपिसोडमध्ये गौरी खान आपल्या खास मैत्रिणी महीप कपूर आणि चंकी पांडेची पत्नी भावना पांडेसोबत दिसणार आहे.

शोमध्ये गौरीने अनेक गुपितांचा उलगडा केला. सध्या किंग खानचे संपूर्ण कुटुंबच चर्चेत असते. शाहरुख आणि गौरीची लेक सुहाना खानही लाइमलाइटमध्ये चर्चेचा विषय बनू लागली आहे. त्यामुळे करणने गौरीला सुहानाबद्दलही काही प्रश्न विचारले.

करणने गौरीला विचारले की, तू सुहानाला कोणत्या डेटींग टीप्स देशील. याचे उत्तर देताना गौरी म्हणाली की, सुहानाने कधीही दोन मुलांना एकत्र डेट करू नये.तिचे हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित सर्वजण हसायला लागतात. सुहाना खान आता लवकरच झोया अख्तरच्या ‘द आर्चिज’ या चित्रपटातून फिल्मी दुनियेत पदार्पण करत आहे.या चित्रपटात तिच्यासोबत श्रीदेवी आणि बोनी कपूरची लेक खुशी कपूरही पदार्पण करत आहे.

त्याचबरोबर गौरी खान लवकरच आपला नवीन शो ‘ड्रीम होम्स विथ गौरी खान’ घेऊन येत आहे. या शोमध्ये ती स्वत: डिझाईन केलेली सेलिब्रिटींची घरे दाखवणार असल्याचे तिने सांगितले.

फोटो सौजन्य- सोशल मीडिया