मराठी कलाकारांच्या घरी गौराई (Gauri Celebration...

मराठी कलाकारांच्या घरी गौराई (Gauri Celebrations Of Marathi Artistes)

गणरायाच्या पाठोपाठ घराघरात गौराईचेदेखील आगमन झाले. आपल्या लाडक्या कलाकारांनीसुद्धा गणपती बाप्पासोबत गौरीची देखील मनोभावे पूजा केली. त्यासंदर्भातील फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होती. पाहूया त्याची झलक.

 ज्ञानदा रामतीर्थकर

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अप्पू म्हणजेच सर्वांची लाडकी ज्ञानदा रामतीर्थकरच्या पुण्याच्या घरी गणपतीसोबतच गौराईचे सुद्धा आगमन झाले. आपल्या घरच्या गौरीला सजवतानाने तिची मनोभावे पूजा करण्याचे फोटो आणि व्हिडिओ ज्ञानदाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

अंकिता लोखंडे

पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेचा लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव. अंकिता लोखंडेकडील गौरी आगमन सोहळा खूप प्रसिद्ध आहे. यंदाही ती व तिचा पती विकी जैनने गौरी गणपतीचा उत्सव मोठ्या दणक्यात साजरा केला.

अर्चना निपाणकर

का रे दुरावा आणि हण्ड्रेड डेज फेम अभिनेत्री अर्चना निपाणकरच्या घरीही गौराईचे आगमन होते. अर्चनाने आपल्या घरच्या गौरी गणपतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

राधा सागर

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत अभिनेत्री राधा सागर खलनायिकेचे पात्र साकारत आहे. पण खऱ्या आयुष्यात मात्र ती खूप मोठी गणेश भक्त आहे. राधाच्या घरीसुद्धा गणपतीसोबत गौरीचे देखील आगमन होते. राधाने आपल्या गौराईचा साजशृंगार आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे.

स्मिता जयकर

हिंदी मालिका किंवा चित्रपटांमध्ये प्रेमळ सासूची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री स्मिता जयकर यांच्याकडे देखील गौराईचे आगमन होते. स्मिता यांच्या गौरीचा साजशृंगार खूप मोठा आणि सुंदर असतो. स्मिता यांनी आपल्या सोशल मीडियावर त्यांच्या गौरीचे फोटो शेअर केले आहेत.

स्मिता तांबे

अभिनेत्री स्मिता तांबेचे तिच्या जोगवा चित्रपटातील अभिनयासाठी खूप कौतुक झाले. त्यानंतर ती लाडाची मी लेक गं या मालिकेत खलभूमिकेत दिसली. स्मिताच्या घरीही गौरीचे धूमधडाक्यात आगमन होते. तिने आपल्या लेकीसोबत गौरीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.