‘सुख म्हणजे नक्की काय...

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत गौराईचं आगमन (Gauri Celebrations In Marathi Serial)

गणपती हे आपल्या सर्वांचच लाडकं दैवत. बाप्पाच्या आगमनाने सारा आसमंत उजळून निघाला आहे. घरोघरी मोदकांचा दरवळ आणि आरतीचे सुमधूर स्वर कानी पडत आहेत. गणेशोत्सवाचा हा जल्लोष स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतही पाहायला मिळणार आहे. शिर्केपाटील कुटुंबात बाप्पाचं स्वागत तर जंगी झालंय आणि बाप्पाच्या पाठोपाठ गौराईंचं पण आगमन दाखवण्यात आलं आहे. त्यांच्या कुटुंबात प्रत्येक सण अगदी जल्लोषात साजरा होतो. त्यामुळे बाप्पा आणि गौराईची साग्रसंगीत पूजाविधी मालिकेत दाखवण्यात आली आहे. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत सुग्रास जेवणाचा आनंदही लुटला आहे.

Gauri Celebrations In Marathi Serial

शिर्केपाटील कुटुंबातील सगळ्यात धाकटी सून आणि जयदीपची पत्नी गौरी पहिल्यांदाच घरी आलेल्या गौराईची पूजा करणार आहे. मालिकेत सेटवर जरी हा गणेशोत्सव साजरा होत असला तरी तेथील सजावट व कलाकारांचा उत्साह हे सगळं वास्तव झालं आहे. मराठमोळ्या पारंपरिक वेशभुषेमुळे कलाकारही गोड दिसत आहेत. एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह असताना मालिकेत नवा ट्विस्टही पाहायला मिळणार आहे. शालिनीचा खरा चेहरा संपूर्ण कुटुंबासमोर येणार आहे. त्यामुळे माईसाहेब शालिनीला नेमका कसा धडा शिकवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Gauri Celebrations In Marathi Serial
Gauri Celebrations In Marathi Serial