पारदर्शक पिवळ्या शर्टात गौहर खानचा समुद्रकिनारी...
पारदर्शक पिवळ्या शर्टात गौहर खानचा समुद्रकिनारी मस्तीभरा डान्स (Gauhar Khan’s Naughty Dance In Transparent Yellow Shirt)

सध्या गौहर खान मालदीव बेटांवर, आपला पती जैद सह सुट्टी एन्जॉय करते आहे. या सहलीचे फोटो आणि व्हिडिओ, ती न चुकता सोशल मीडियावर शेअर करते आहे. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये पारदर्शक पिवळा शर्ट घालून ती एका बोटीवर मस्तीभरा डान्स करताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल असलेल्या गौहर खानने आपला ३८ वा वाढदिवस फॅमिली समवेत नुकताच साजरा केला. त्यानंतर ती पती जैदसह मालदीवला सहलीस गेली. तिथून पाठवत असलेल्या एका फोटोज्मध्ये ती पिवळा पारदर्शक शर्ट घालून तो डान्स करताना दिसत आहे; त्यामध्ये ती भलतीच हॉट वाटते आहे. तिचे वय जाणवत नाही.
पिवळ्या पारदर्शक शर्टातून तिची उघडी कांती दिसते आहे. खाली तिने पांढरे शॉर्टस् घातले आहेत. आपले हे फोटो शेअर करून गौहर लिहिते – ‘सन ॲन्ड सॅन्ड’.

तिचे हे पारदर्शक कपड्यातील फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत. तिचे चाहते भरपूर प्रमाणात आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

या फोटोंसोबत तिने धमाकेदार डान्स करत असलेला व्हिडिओ शेअर केला आहे.
मालदीव बेटांवर यापूर्वी देखील गौहर गेलेली आहे. अन् तिथे सहलीची मौज घेत असलेले फोटो तिने वेळोवेळी टाकले आहेत.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम