गश्मीर महाजनीला इंटीमेट सीन करायला आवडतात, या अ...

गश्मीर महाजनीला इंटीमेट सीन करायला आवडतात, या अटींवर देतो बोल्ड सीन्स (Gashmir mahajani likes to do intimate scenes, but on his own terms)

सध्या टीव्हीवरील मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी चांगलाच चर्चेत आहे. टीव्ही डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा’मध्ये त्याने आपल्या धमाकेदार डान्सने सर्वांची मने जिंकली आहेत. तो या शोचा सर्वात लोकप्रिय स्पर्धक म्हणून ओळखला जातो. नुकताच त्याचा डान्स महाराष्ट्र डान्स लिटील मास्टर्स हा मराठी शो संपला. गश्मीरने या शोचे परीक्षण केले होते. तसेच त्याने टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘इमली’मध्येही काम केले होते. उत्कृष्ट डान्सर असूनही गश्मीर स्वत:ला सरासरी डान्सरच म्हणतो.

मालिकेत अनेकदा गश्मीरने उघड्या अंगाने सीन्स दिले आहेत. इंटीमेट सीन्सबद्दल गश्मीर म्हणाला की, “जर ती दृश्ये पटकथा आणि कथेला न्याय देत असतील आणि त्या दृश्याने कथेचे सौंदर्य वाढत असेल, तसेच त्याच वेळी जर प्लॅटफॉर्मने त्या दृश्याला परवानगी दिली तर मला ते सीन करायला कोणतीही अडचण नाही.”

गश्मीर पुढे म्हणाला की, “जर माझे पात्र त्या दृश्याला न्याय देऊ शकत असेल आणि मला ते पात्र आवडले तर माझे पात्र प्रामाणिक साकारण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन. माझ्या बाजूने कोणतेही बंधन नाही. जर मी तसे केले असते तर मी कदाचित दुसर्‍याच व्यवसायात असतो.”

लवकरच गश्मीर महाजनी टीव्ही रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसणार आहे.  मुलाखतीदरम्यान अभिनेत्याने याबाबत सांगितले की, “रोहित सरांना नाही म्हणण्याची माझी काय हिंमत….मी त्यांना नाकारू शकत नाही. मी पूर्णपणे अडकलो होतो. त्यांना हो म्हणण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.”