‘गंगुबाई काठियावाडी’ चे डिजिटल हक्क...

‘गंगुबाई काठियावाडी’ चे डिजिटल हक्क ७० कोटी रुपयांना विकले; दिवाळीला प्रदर्शित होणार (Gangubai Kathiyawadi’s Digital Rights Sold in 70 Crores, Film To Be Released Around Diwali)

दिग्दर्शक संजय लीला भन्साली आपल्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या संदर्भात काहीही तडजोड करत नाहीत. सतत ३ महिने ते या चित्रपटाचं शुटिंग करताहेत. चित्रपट बराचसा तयार झाला आहे. आता बातमी अशी आहे की, त्यांनी या चित्रपटाचे डिजिटल हक्क, नेटफ्लिक्सला ७० कोटी रुपयांना विकले आहेत. सदर चित्रपट दिवाळीच्या सुमाराला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. माफिया क्वीन म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या गंगुबाईच्या जीवनावर हा चित्रपट बेतला आहे.

फोटोसौजन्य:इंस्टाग्राम

भन्साली आपल्या प्रत्येक चित्रपटाचा भव्य सेट दाखवतात. त्यांच्या गाण्याचे शुटिंग देखील अधिक ग्लॅमराईज केलेले असते. या गंगुबाईसाठी देखील याच प्रकारे काम चालले असून त्यातील नाचगाणी भव्य स्वरुपात चित्रित केली जातील.

फोटोसौजन्य:इंस्टाग्राम

या चित्रपटासाठी गोरेगावात मोठा सेट लावला आहे. कामाठीपुरा या बजबजपुरीचे प्रतिरुप त्यामध्ये निर्माण करण्यात आले आहे. २०० हून अधिक डान्सर्सना घेऊन त्यावर गाणी चित्रित होतील. ‘माफिया क्विन्स ऑफ मुंबई’ या हुसैन झैदी लिखित पुस्तकाच्या आधारे हा चित्रपट तयार केला जात असून आलिया यामध्ये वेश्यागृहाच्या मालकिणीची भूमिका करत आहे. आलियाच्या कामावर संजय लीला भन्साली बऱ्यापैकी खूश आहेत, अशी बातमी आहे.

फोटोसौजन्य:इंस्टाग्राम

या चित्रपटाबाबत काही वाद निर्माण झाले आहेत. पण संजयनी आपलं शुटिंग थांबवलं नाही. आपल्या या भूमिकेवर आलियाने उत्सुकता दाखविली आहे. तिच्या चाहत्यांना देखील या चित्रपटाची उत्कंठा आहे.