‘गंगुबाई काठियावाडी’ चे बर्लिन महोत...

‘गंगुबाई काठियावाडी’ चे बर्लिन महोत्सवात प्रदर्शन; ‘बॉलिवूड’ ऐवजी ‘भारतीय’ म्हणा – भन्साळींचा आग्रह (‘Gangubai Kathiawadi’ Appreciated In Berlin Film Festival : Bhansali Insists Say ‘Bharatiya’ Instead Of ‘Bollywood’)

‘बॉलिवूड’ हा चमत्कारीक शब्द आहे. भारतीय चित्रपट अनेक भाषांमध्ये तयार होतात. त्यामुळे या चित्रसृष्टीला ‘बॉलिवूड’ म्हणण्याऐवजी ‘भारतीय’ म्हणायला पाहिजे, असे मत ‘गंगुबाई काठियावाडी’ या येऊ घातलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी प्रदर्शित केले. हा चित्रपट बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपटात दाखविण्यात आला व तेथे त्याला चांगलीच प्रशस्ती लाभल्याचे त्यांनी सांगितले.

हा चित्रपट मुंबईच्या कामाठीपुरा भागातील कोणे एके काळी गाजलेल्या गंगुबाई हरजीवनदास या व्यक्तीरेखेच्या जीवनावर आधारित असून तो लवकरच प्रदर्शित होईल. मात्र या चित्रपटाला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.

कारण सदर गंगुबाईच्या कुटुंबियांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला असून कोर्टात प्रकरण दाखल केले आहे. आलिया भट्ट अभिनीत ही व्यक्तीरेखा चुकीची दाखविण्यात आली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. गंगुबाईंचे दत्तक पुत्र बाबुरावजी यांनी गेल्या वर्षी या चित्रपटावर बंदी आणण्याबाबत याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने त्यास नकार दिला होता व हे प्रकरण अद्याप संपलेले नाही. ‘माझ्या आईला एक डॉन आणि सेक्स वर्कर दाखविण्यात आले आहे. ते चूक आहे. या चित्रपटासाठी आमची परवानगी घेण्यात आलेली नाही. म्हणून आम्ही कोर्टात धाव घेतली आहे,’ असे बाबूरावजी यांनी डॉट इनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

या संदर्भात संजय भन्साळी यांनी पूर्वीच सांगितले आहे की, हुसेन झैदी लिखित ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकामधील गंगुबाईंच्या जीवनावरील जो भाग आहे, त्यावर चित्रपटाची संहिता तयार करण्यात आली आहे.