मराठी कलाकारांचा गणेशोत्सव (Ganesh Utsav Celebr...

मराठी कलाकारांचा गणेशोत्सव (Ganesh Utsav Celebration Of Marathi Actors )

सध्या देशभर गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जात आहे. दिवसरात्र शूटिंग करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या मराठी कलाकारांनी आपल्या कामातून वेळ काढत बाप्पाचे स्वागत केले आहे. आज आम्ही तुम्हाला आपल्या मराठमोळ्या सेलिब्रेटींच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घडवणार आहोत.

ज्ञानदा रामतीर्थकर

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील सर्वांची लाडकी अप्पू म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकही मुळची पुण्याची आहे. त्यामुळे ज्ञानदाने कामातून वेळ काढत आपल्या पुण्याच्या घरी बाप्पाचे जोरदार स्वागत केले. यावेळी ज्ञानदाच्या घरी बाप्पासाठी फुलांची आरास केली होती.

श्रेयस तळपदे

माझी तुझी रेशीमगाठमधील यश म्हणजेच लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेच्या घरी सुद्धा बाप्पाचे आगमन झाले. श्रेयसने त्याचे आणि पत्नीचे बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिज्ञा भावे

तू तेव्हा तशी मालिकेतील खलनायिका अभिज्ञा भावेच्या घरीसुद्धा बाप्पाचे आगमन झाले. अभिज्ञाच्या घरी बाप्पासाठी आगळावेगळा देखावा तयार करण्यात आलेला. यासंदर्भातील फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रुपाली भोसले

बिग बॉस फेम रुपाली भोसलेला सध्या आपण आई कुठे काय करते या मालिकेत संजनाच्या भूमिकेत पाहतो. रुपालीच्या घरी सुद्धा बाप्पाचे आगमन झाले. यावेळी तिने पर्यावरणपूरक असा देखावा केला होता.

सिद्धार्थ चांदेकर- मिताली मयेकर

मराठी सिनेसृष्टीतील सर्वांची आवडती जोडी सिद्धार्थ आणि मितालीने आपल्या घरी बाप्पाचे आगमन केले. त्यांनी आपले बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम