रिचा चढ्ढाने भारतीय सैन्याविषयी केलेलं वक्तव्य ...

रिचा चढ्ढाने भारतीय सैन्याविषयी केलेलं वक्तव्य तिला भोवलं, मोठी चूक केल्याचे लक्षात येताच मागितली माफी (‘Galwan Says Hi’ Richa Chadha Deletes Her Galwan Tweet After Controversy, Actress Issues Public Apology Ater Receiving Backlash For This Controversial Tweet)

अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने नुकत्याच केलेल्या ट्विटने खळबळ उडवून दिली आहे. आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या रिचाला आता माफी मागावी लागली आहे. तिनं भारतीय सैन्याविषयी केलेलं वक्तव्य तिला भोवलं आहे. सोशल मीडियावरुन तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. अनेकांनी तिला ट्रोलही केलं होतं. यानंतर रिचानं जी पोस्ट केली आहे त्यावरुन हे प्रकरण आपल्या अंगाशी आल्याचं तिच्या लक्षात आलं आहे.

बॉलीवूडमधील काही अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्यासाठी सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टीवर व्यक्त होत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. वादाला सुरुवात करुन देतात. आणि अडचणीत आल्यानंतर माफीही मागतात. रिचा चढ्ढाच्या बाबतीत असंच काहीसं झालं आहे.

तिनं भारतीय लष्कराची खिल्ली उडवणारं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. सोशल मीडियावर जेव्हा रिचाला ट्रोल करण्यात आले त्यानंतर तिला आपण मोठी चूक केल्याचे लक्षात आले आणि तिनं तातडीनं माफी मागितली आहे. ट्विट करत आपण जे काही बोललो त्याबद्दल माफी मागते असे तिनं लिहिलं आहे.

रिचा आपल्या ट्विटमध्ये म्हणते, ‘माझ्या बोलण्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागते. माझा कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. तसेच भारतीय सैन्य दलाचा अपमान करण्याचा माझा विचारही नव्हता. माझे आजोबा हे देखील भारतीय सैन्यात उच्च पदावर होते. त्यामुळे मला भारतीय सैन्याविषयी अभिमान आहे. मी त्यांचा अपमान करणार नाही. तरीही माझ्या बोलण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी माफी मागते. असं रिचानं म्हटलं आहे.’

उत्तर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले होते की, पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज आहे. भारतीय सेना कुठल्याही कारवाईसाठी पूर्णपणे तयार आहे. भारत सरकार जो आदेश देईल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. या विधानाचा संदर्भ देत रिचा चड्ढाने ट्विटरवर लिहिले की, ‘गलवान ही कह रहा है’. यानंतर भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘अभद्र ट्विट. ते लवकर मागे घेतले पाहिजे, आमच्या सशस्त्र दलांचा अपमान करणे योग्य नाही.

विशेष म्हणजे 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली होती, ज्यामध्ये आमचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते आणि चिनी सैन्याचेही नुकसान झाले होते. लोकांनी रिचाविरुद्ध एफआयआरची मागणी केली आहे.

वाढता वाद पाहून अभिनेत्रीने ट्विट डिलीट केले आणि माफीही मागितली आहे.