विकी कौशल ते ह्रतिक रोशन, बॉलिवूडचे हे कलाकार फ...

विकी कौशल ते ह्रतिक रोशन, बॉलिवूडचे हे कलाकार फिट राहण्यासाठी फॉलो करतात हा डाएट (From Vicky Kaushal To Hrithik Roshan, Discover Special Diets Followed By Bollywood Actors)

अर्जुन कपूर सारखी बॉडी असणं, विकी कौशलसारखे मसल्स असणं किंवा ह्रतिक रोशनसारखं फिट राहणं प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं. पण हे कलाकार स्वत:ला फिट ठेवण्यासाठी कोणते डाएट फॉलो करतात हे तुम्हाला माहीत आहे का ? अर्जुन कपूर, विकी कौशल, ह्रतिक रोशनसारखे शरीर हवे असेल तर त्यासाठी जिममध्ये तासन्‌तास व्यायाम करून घाम गाळावा लागतो. तसेच आपल्या खाण्या-पिण्यावर ताबा ठेवावा लागतो अर्थात योग्य आहाराचे सेवन करावे लागते.

अर्जुन कपूर

अर्जुन डाएटमध्ये ४ वेळा खातो. त्याच्या दिवसभराच्या डाएटमध्ये १२०० कॅलरीज असतात. त्यात तो सकाळी प्रोटीन युक्त नाश्ता करतो. दुपारच्या जेवणात संतुलित आहार घेतो. स्नॅक्समध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडस् आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडस्‌युक्त पदार्थ असतात. रात्रीचे जेवण फायबर आणि प्रथिनांनी भरलेले असते.

कतरीना कैफ

अभिनेत्री कतरीना कैफ कधीच आपल्या फिटनेसशी तडजोड करत नाही. कतरीनाच्या डाएटमध्ये खाओ सुए (Khao suey), होम मेड कोकोनट मिल्क, बकव्हीट नूडल्स, बीन्स स्प्राउट्स, शिमाजी मशरूमचा समावेश असतो.

हृतिक रोशन

हृतिक त्याचे डाएट नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या तीन भागांत विभागतो. काही वेळेस संध्याकाळच्या नाश्त्याचाही त्यात समावेश असतो. नाश्त्यामध्ये प्रथिनेयुक्त पदार्थ असतात. दुपारच्या जेवणात भात, क्विनोआ आणि पिष्टमय भाज्या असतात. ह्रतिक रात्री कार्ब्सयुक्त पदार्थ खात नाही. त्याऐवजी तो हिरव्या भाज्या खाणे पसंत करतो.

शाहिद कपूर

शाहिद कपूर त्याच्या फूड कन्सल्टंटच्या सल्ल्यानुसार आहारात रताळ्याचे पॅटीस, कोकोनट योगर्ट,खजूर चटणी आणि मगज बियांचा समावेश करतो.

विकी कौशल

विकी कौशलचा डाएट प्लॅन हा त्याच्या चित्रपटाच्या भूमिकांवर अवलंबून असतो. चित्रपटातील पात्राच्या फिटनेसच्या आधारे ते डाएट फॉलो करतो. इतर दिवसांत ३५०० कॅलरीज, ३० टक्के फॅट, २५% प्रथिने आणि ४०-५०% कार्बोहायड्रेट मिळतील अशा आहाराचे सेवन करतो. विकी पंजाबी असल्याने तो मुळात खूप खवय्या आहे. भूक शांत करण्यासाठी काही वेळेस तो पेर-आंबा-अॅवोकॅडोचे सॅलाडही खातो.

करण जोहर

चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या आहारात घरी बनवलेली खिचडी, कोको पेकन बटर, रॉ मॅपल आणि बेरीज् खाणे पसंत करतो.