उर्फी जावेद ते संजीदा शेख या टी. व्ही. कलावतींन...

उर्फी जावेद ते संजीदा शेख या टी. व्ही. कलावतींनी अंग उघडे टाकणारी चित्रविचित्र फॅशन करून स्वतःचे हसे करून घेतले (From Urfi Javed To Sanjeeda Sheikh, These TV Actresses Got Trolled For Their Weird Outfits)

बॉलिवूड दिवाजप्रमाणे टेलिव्हिजनवरील कलावतींनीही अनेकदा त्यांच्या चित्रविचित्र फॅशन आणि स्टाइल करून स्वतःचे हसे करून घेतले आहे. सेलिब्रिटी म्हटल्यावर त्यांना आपल्या चाहत्यांच्या प्रशंसेबरोबरच टीकेचाही सामना करावा लागणे साहजिकच आहे. तसं पाहिलं तर टी.व्ही. वरील या काही लोकप्रिय तारका फॅशनच्या बाबतीत बॉलिवूडमधील तारकांनाही तोडीस तोड आहेत.  आणि म्हणूनच त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागते.

बिग बॉस फेम उर्फी जावेद नेहमीच तिच्या विचित्र फॅशनमुळे लोकांच्या टीकेला सामोरी जात असते. त्यातच अलीकडे संजीदा शेखला तिच्या रिव्हीलिंग आउटफिटसाठी सोशल मीडियावर बरेच निंदीले गेले. यांच्या व्यतिरिक्त काही अभिनेत्री आहेत ज्यांच्या त्यांच्या विचित्र पोशाखामुळे ट्रोल व्हावे लागले आहे. जाणून घेऊया त्या कोण आहेत?

संजीदा शेख

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रींपैकी एक असलेल्या संजीदा शेखने नुकताच हॉल्टर गाऊनमधील स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने ब्रा घातली नाही. या व्हिडिओने एकीकडे इंटरनेटचे तापमान वाढवले ​​असतानाच दुसरीकडे अभिनेत्रीलाही तिच्या आउटफिटमुळे ट्रोलिंगचा शिकार व्हावे लागले. अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक केले तर अनेकांनी तिला निर्लज्ज आणि असभ्य म्हटले. ट्रोल करताना अनेकांनी तर तिला ब्रा घालण्याचा सल्लाही दिला.

उर्फी जावेद

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद विशेष करून तिच्या रिस्क स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. तिच्या बोल्ड फॅशन स्टाइलमुळे ती अनेकदा चर्चेत असते. उर्फी तिच्या ड्रेसिंग सेन्सने लोकांचे लक्ष वेधून घेण्यात कधीही अपयशी ठरत नाही, परंतु तिला अनेकदा ट्रोलिंगचा शिकार व्हावे लागते. अलीकडेच विचित्र थ्रू-टॉप परिधान केल्यामुळे विमानतळावर तिला ट्रोल करण्यात आले. तिचा ओपन बटन जीन्स लूक असो किंवा बॅकलेस लूक, तिला तिच्या आउटफिट्ससाठी अनेकदा ट्रोल केले जाते.

निया शर्मा

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

टीव्हीची नागिन निया शर्मा तिच्या बोल्ड आणि सुंदर फोटोंनी सोशल मीडियावरील तापमान वाढवणारी म्हणून ओळखली जाते. मात्र, तिच्या फॅशन सेन्ससाठी तिला अनेकवेळा ट्रोलही करावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी, अभिनेत्रीने तिचा जबरदस्त ट्यूब टॉप आणि व्हाईट जीन्समधील फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तिच्या जीन्सचे बटण उघडे होते. ट्रोलर्सनी नियाला तिच्या आउटफिटवरून सोशल मीडियावर तिला अतिशय वाईटरीत्या ट्रोल केले. त्याच्या पोस्टवर नकारात्मक कमेंट करून नेटिझन्सनी देखील तिची टीका केली आहे.

अनुषा दांडेकर

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

वीजे अनुषा दांडेकर तिच्या बोल्ड आणि स्टायलिश स्टाइलसाठी ओळखली जाते. फोटोंच्या माध्यमातून तिच्या टोन्ड शरीराची झलक दाखवणारी अनुषा आता इंटरनेट युजर्सच्या निशाण्यावर आली आहे. काही काळापूर्वी अभिनेत्रीने तिच्या एका फोटोशूटमधील एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती कार्डिगनमध्ये पोज देताना दिसली होती. मात्र, तिचा हा फोटो पाहून काही इंटरनेट युजर्सना अश्लील कमेंट करण्याची संधी मिळाली. अनुषाला तिच्या विचित्र पोशाखांमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले.

दिव्या अग्रवाल

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

‘बिग बॉस ओटीटी’ विजेती दिव्या अग्रवाल अनेकदा नकारात्मक कमेंट आणि ट्रोलिंगची शिकार झाली आहे. तिचा क्लीवेज दाखवल्याबद्दल ट्रोल झाल्यापासून ते कॉन्सेप्ट फोटोशूटसाठी टॉपलेस होण्यापर्यंत तिला सोशल मीडियावर ट्रोलचा सामना करावा लागला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ती तिची क्लीवेज दाखवल्यामुळे निंदकाच्या निशाण्यावर आली होती, पण ती गप्प बसली नाही. तिने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. याआधी एका कॉन्सेप्ट फोटोशूटसाठी दिव्याला टॉपलेस झाल्याने ट्रोल करण्यात आले होते.