2023 मध्ये हे प्रसिद्ध स्टारकिड्स करणार आपल्या ...

2023 मध्ये हे प्रसिद्ध स्टारकिड्स करणार आपल्या अभिनयातील करीअरचा श्रीगणेशा (From Suhana Khan to Ibrahim Ali Khan, These Famous Star Kids Will Rock Bollywood in The Year 2023)

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्टार किड्सची लोकप्रियता कोणत्याही सेलिब्रेटींपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावरही त्यांची जबरदस्त फॅन फॉलोइंगही पाहायला मिळते. अनेक स्टार किड्स लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत. चाहतेही त्यांना पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अनेक स्टार किड्स आहेत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. आज आम्ही तुम्हाला 2023 मध्ये पदार्पण करणाऱ्या स्टारकिड्सबद्दल सांगणार आहोत.

सुहाना खान

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान अनेकदा चर्चेत असते, आता ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहाना पुढच्या वर्षी झोया अख्तरच्या ‘द आर्चीस’ चित्रपटातून पदार्पण करणार आहे.

इब्राहिम अली खान

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आता लवकरच तिचा भाऊ इब्राहिम अली खानही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इब्राहिमच्या पदार्पणाच्या चित्रपटात काजोलची महत्त्वाची भूमिका असेल.

अगस्त्य नंदा

पुढील वर्षी पदार्पण करणाऱ्या स्टार किड्समध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य नंदा याचेही नाव सहभागी आहे. अगस्त्य नंदा झोया अख्तरच्या ‘द आर्चीस’ या चित्रपटातून पदार्पण करणार आहे, त्यात त्याच्यासोबत खुशी कपूर आणि सुहाना खान देखील दिसणार आहेत.

खुशी कपूर

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय तरुण अभिनेत्रींपैकी एक आहे, आता लवकरच त्यांची छोटी मुलगी खुशी कपूरही पदार्पण करणार आहे. जान्हवीची धाकटी बहीण खुशी कपूर पुढच्या वर्षी झोया अख्तरच्या ‘द आर्चीस’ चित्रपटातून पदार्पण करणार आहे.

शनाया कपूर

संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूरही बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. ती पुढच्या वर्षी मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. शनाया आपल्या करीअरची सुरुवात निर्माता करण जोहरच्या ‘बेधडक’ या चित्रपटातून करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जुनैद खान

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद खान देखील त्या स्टार किड्सपैकी एक आहे जो पुढील वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुनैद ‘महाराजा’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार आहे, त्यात  तो पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

पलक तिवारी

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे, मात्र पुढच्या वर्षी ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

पश्मिना रोशन

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन कार्तिक आर्यनसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे, पण लवकरच ती मोठ्या पडद्यावरही दिसणार आहे. पश्मिना ‘इश्क विश्क रिबूट’ या चित्रपटातून आपल्या अभिनय करीअरची सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.