शिल्पा शेटी, कंगना रनौत ते हिना खान पर्यंत, परफ...

शिल्पा शेटी, कंगना रनौत ते हिना खान पर्यंत, परफेक्ट विंटर लुक साठी या बॉलीवुड अभिनेत्रींप्रमाणे नेसा साडी! (From Shilpa Shetty, Kangana Ranaut to Hina Khan: How to wear a sari in winter like these Bollywood divas!)

साडी हे आपलं पारंपरिक वस्त्र असलं तरी आजही तिचा वापर अजिबात थांबलेला नाही. उलट आजच्या आधुनिकतेचा विचार करता निरनिराळ्या डिझाइन्सच्या साड्या बनविल्या जात आहे. पारंपरिक साडी आधुनिक पद्धतीने नेसली जात आहे. तुम्हीही या थंडीच्या दिवसांत एका वेगळ्या अंदाजाने साडी नेसू इच्छित असाल तर या बॉलिवूडच्या अभिनेत्रींची साडी नेसण्याची तऱ्हा फॉलो करू शकता.
जॅकेटसोबत साडी नेसा

फ्यूजन फॅशन हा बॉलीवूडच्या तारकांचा स्टाईल मंत्र आहे. साडीला फ्यूजन लूक देण्यासाठी तुम्ही थंडीमध्ये साडीवर क्रॉप जॅकेट घालू शकता. एखादा विशेष समारंभ असेल तर साडीवर हेवी जॅकेट छान दिसतो. जसे – शिल्पा शेट्टीने गोल्डन रंगाच्या साडीसोबत गोल्ड लॉग्न जॅकेट घातले आहे.

करिश्मा सारखे लाल रंगाच्या साडीवर गोल्डन सिल्क जॅकेट घाला.

कॅज्युअल लुकसाठी करिश्मा कपूने प्रिंटेड साडीवर सिंगल कलरचं जॅकेट घातलं आहे.

साडीला शॉल किंवा स्टोलसोबत मॅच करा.

थंडी म्हणजे लग्नाचा मोसम. तेव्हा लग्नासाठी तयार होताना कंगनाप्रमाणे साडी नेसण्याचा अट्टहास धरा. कंगनाने आयवरी रंगाच्या सब्यासाच्या डिझायनर साडीसोबत कुल्लू शाल ओढली आहे. ही शाल वजनाने हलकी असल्याने स्टायलिश वाटते. यासोबत कंगनाने हिमाचली टोपीही घातली आहे. त्यामुळे तिला एक स्टायलिश आणि ड्रॅमॅटिक लूक मिळाला आहे.

टर्टल नेकसोबत साडी नेसून पाहा
तुम्ही तुमची साडी हाय नेक किंवा टर्टल नेकच्या स्वेटरसोबतही घालू शकता. अभिनेत्री हिना खान सारखं तुम्ही देखील ब्लाऊजशिवाय टर्टल नेक स्वेटरवर साडी नेसून पाहा.

यामुळे तुम्हाला थंडीही वाजणार नाही. आणि तुम्ही अतिशय फॅशनेबल दिसाल.

जमिनीपर्यंत लांब (फ्लोअर लेन्थ) मॅचिंग जॅकेटसोबत साडी.

साडीसोबत मॅचिंग जॅकेट हा थंडीमधील परफेक्ट साडी लूक आहे. आजकाल बऱ्याचशा डिझायनर साड्यांसोबत मॅचिंग जॅकेटही दिलं जातं. इथे सोनम कपूर आणि सोनाक्षी सिन्हाने अनामिका खन्नाची पीच रंगाची अगदी हलकी साडी नेसली आहे, त्यासोबत मॅचिंग फ्लोअर लेंथ जॅकेटही त्यांनी घातलं आहे.

या फ्लोअर लेंथ जॅकेटमुळे थंडीही जाणवणार नाही आणि स्टायलिश लूक मिळेल तो वेगळाच.