आपला शेवटचा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच या...

आपला शेवटचा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच या कलाकारांनी घेतला जगाचा निरोप(From Satish Kaushik to Sushant Singh Rajput, These Stars Died Before Release of Their Last Film)

आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदाने वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे सतीश कौशिक यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मृत्यूपूर्वी, ते मोठ्या उत्साहात होळी सण साजरा करताना दिसले होते, मात्र ही त्यांच्या आयुष्यातील शेवटची होळी ठरेल असे कोणाच्याच ध्यानीमनी नव्हते. सतीश यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे. गुरुवारी संध्याकाळी, सतीश कौशिक पंचतत्त्वात विलीन झाले. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या अंतिम यात्रेत सहभाग घेतला आणि साश्रू डोळ्यांनी अभिनेत्याला निरोप दिला. आपला शेवटचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सतीश यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. त्यांच्याशिवाय, असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आपला शेवटचा चित्रपट पाहण्यापूर्वीच हे जग सोडले.

सतीश कौशिक

सतीश कौशिक यांच्या निधनामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली असून ते या जगात नाहीत यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. सतीश कौशिक यांनी आपला शेवटचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या जगाचा निरोप घेतला. कंगना राणावतच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटात ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सुशांत सिंह राजपूत

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या मुंबईतील राहत्या घरात सापडला होता. सुशांतला त्याचा शेवटचा चित्रपट पाहता आला नाही. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर त्याचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सुशांतचा हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

ऋषी कपूर

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनाही आपला शेवटचा चित्रपट पाहता आला नाही. ‘शर्मा जी नमकीन’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता, जो त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला होता. ऋषी कपूर या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी परेश रावल यांनी शूटिंग पूर्ण केले.

श्रीदेवी

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. पण श्रीदेवीही आपला शेवटचा चित्रपट पाहू शकली नाही. श्रीदेवीने शाहरुख खानच्या ‘झिरो’ चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून काम केले होते. हा चित्रपट अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला होता.

दिव्या भारती

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दिव्या भारती हिने अगदी लहान वयात या जगाचा निरोप घेतला. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिचे एक नव्हे तर ५ चित्रपट प्रदर्शित झाले. तिच्या आकस्मिक निधनाच्या बातमीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

अमरीश पुरी

बॉलिवूड चित्रपटांमधील खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे अभिनेता अमरीश पुरी हे देखील अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी शेवटचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या जगाचा निरोप घेतला. अमरीश पुरी यांच्या निधनानंतर त्यांचे ‘पूरब की लैला पश्चिम का छैला: हॅलो इंडिया’ आणि ‘मिशन: द लास्ट वॉर’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले.

मधुबाला

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधुबालाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या अभिनयावरच नव्हे तर तिच्या सौंदर्यावरही लोकांना भुरळ पडली होती. जेव्हा या अभिनेत्रीचे निधन झाले, तेव्हा तिच्या चाहत्यांना खूप दुःख झाले. तिचा ‘ज्वाला’ हा चित्रपट तिच्या मृत्यूनंतर जवळपास दोन वर्षांनी प्रदर्शित झाला होता.