सलमान खान पासून ते कपिल शर्मापर्यंतच्या कलाकारा...

सलमान खान पासून ते कपिल शर्मापर्यंतच्या कलाकारांनी नशेत केले होते लज्जास्पद काम (From Salman Khan To Kapil Sharma, These Stars Did A Shameful Act When They Got Drunk)

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानची मुलगी सारा अली खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यात सारा मद्यधुंद अवस्थेत एका रेस्टॉरंटच्या गार्डला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत होती. यामुळे सारा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. दारुच्या नशेत असे कृत्य करणारी सारा अली खान ही पहिली बॉलिवूड स्टार नाही, याआधीही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी दारू पिऊन लज्जास्पद कृत्य केले आहे.

शाहरुख खान

२०१२ मध्ये जेव्हा कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला हरवून विजेतेपद पटकावले होते. तेव्हा शाहरुख इतका खूश झाला की त्याने वानखेडे स्टेडियमवरच सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. त्याचवेळी फ्लड लाइट बंद झाल्यावर शाहरुख खानने मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केले होते आणि त्यांना शिवीगाळ केली होती. त्यावेळी किंग खान नशेत असल्याचे सांगण्यात येत होते.

सलमान खान

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यानेही दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी लज्जास्पद कृत्य केले होते. 2002 मध्ये त्याच्यावर ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र या प्रकरणात त्याला दिलासा मिळाला. 2008 मध्ये कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत सलमान खान  याने दारू पिऊन शाहरुख खानसोबत भांडण केले होते.

कपिल शर्मा

कॉमेडीचा बादशाह कपिल शर्माने काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर विमानात सुनील ग्रोव्हरला शिवीगाळ केली होती, त्यानंतर सुनील ग्रोव्हरने त्याचा शो सोडला होता. याशिवाय 2015 मध्ये देखील त्याच्यावर दारुच्या नशेत अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप झाला होता.

मलायका अरोरा

अरबाज खानची एक्स पत्नी मलायकाही दारूच्या नशेत पार्टीत गोंधळ घातल्याने चर्चेत आली होती. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत मलायकाने मद्यधुंद अवस्थेत चांगलाच गोंधळ घातला होता. जेव्हा सोनम कपूरने तिला हाताळण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती तिच्यावर देखील चिडली होती.

आमिर खान

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यानेही दारूच्या नशेत  एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो सलमान खानसोबत झाडासमोर लघवी करताना दिसत होता. त्या फोटोला त्याने कॅप्शन लिहिले होते की, – माझा आवडता फोटो… सलमान आणि मी… दोन मित्रांनी एका झाडावर लघवी केली तर मैत्री वाढते. या फोटोवरून दोघांवरही जोरदार ट्रोल केले होते.

संजय दत्त

संजू बाबा म्हणजेच संजय दत्तही अनेकदा नशेच्या अवस्थेत गैरवर्तन केल्यामुळे चर्चेत आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, दारूच्या नशेत तो सलमान खानसारख्या जवळच्या मित्रांशीही भांडला. तसेच त्याने एकदा ‘संजू’ चित्रपटाच्या पार्टीत रणबीर कपूरची खिल्ली उडवली होती.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम