रुबीना दिलैकपासून ते धीरज कपूरपर्यंतचे कलाकार झ...

रुबीना दिलैकपासून ते धीरज कपूरपर्यंतचे कलाकार झलक दिखला जा 10 साठी घेतात भरघोस मानधन (From Rubina Dilaik to Dheeraj Dhoopar, Know Fee of These Stars for ‘Jhalak Dikhhla Jaa 10’)

‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोचा 10 वा सीझन प्रेक्षकांना खूप आवडला आहे. हा शो 3 सप्टेंबरपासून सुरु झाला. धक-धक गर्ल माधुरी दीक्षित, चित्रपट निर्माता करण जोहर आणि नोरा फतेही हे या शोचे परीक्षक आहेत. तर अनेक मोठे टीव्ही सेलिब्रेटी या परीक्षकांसमोर आपले नृत्य कौशल्य दाखवताना दिसत आहेत. झलक दिखला जा 10 मध्ये शिल्पा शिंदे, रुबिना दिलैक, धीरज धूपर आणि निया शर्मा यांसारखे अनेक मोठे सेलिब्रेटी आहेत. परंतु हे सेलिब्रेटी एका एपिसोडसाठी किती पैसे घेतात हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर चला जाणून घेऊ.

शिल्पा शिंदे

‘भाभी जी घर पर हैं’मध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे बऱ्याच दिवसांनी ‘झलक दिखला जा’मधून टीव्हीवर परतली आहे. या शोच्या एका एपिसोडसाठी शिल्पाला ५ लाख रुपये फी मिळत आहे.

रूबीना दिलैक

‘खतरों के खिलाडी 12’ नंतर ‘बिग बॉस 14’ ची विजेती रुबिना दिलैक आता ‘झलक दिखला जा 10’ मध्ये आपल्याला बेधुंद नाचताना दिसत आहे. रुबिना दिलैक या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी सुमारे 7 लाख रुपये घेत आहे.

धीरज धूपर

‘कुंडली भाग्य’ फेम धीरज धूपरला नुकतेच बाळ झाले. आता तो या डान्स रिअॅलिटी शोमध्ये डान्स करताना दिसत आहे. धीरजला प्रत्येक एपिसोडसाठी फी म्हणून अडीच लाख रुपये दिले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

निया शर्मा

टीव्हीवरील सर्वात बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री निया शर्मा देखील ‘झलक दिखला जा 10’ मध्ये आपले नृत्य कौशल्य दाखवताना दिसत आहे. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी निया प्रति एपिसोड सुमारे 2.5 लाख रुपये आकारत आहे.

अली असगर

‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’ या कॉमेडी शोमध्ये आजीची भूमिका साकारून प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता अली असगरही या शोमध्ये डान्स करताना दिसत आहे. मात्र, यासाठी त्याला प्रति एपिसोड सुमारे दोन लाख रुपये दिले जात आहेत.

फैजल शेख

‘खतरों के खिलाडी 12’मध्ये खतरनाक स्टंट केल्यानंतर फैजल शेख आता ‘झलक दिखला जा 10’मध्ये डान्स करताना दिसत आहे. या शोसाठी त्याला भरघोस फी देखील दिली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार फैजल फी म्हणून 10 ते 11 लाख रुपये घेत आहे.

पारस पासवान

पारसने अनुपमा या मालिकेत समर हे पात्र साकारुन प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवली. आता तो झलक दिख ला जा मध्ये आपल्या नृत्याची कला सादर करत आहे. त्यासाठी तो प्रतिएपिसोड 50 हजार रुपये घेतो.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम