रिना – किरण ते फातिमा : आमिर खानच्या लव्ह...

रिना – किरण ते फातिमा : आमिर खानच्या लव्ह लाइफमध्ये २ लग्नं… ६ प्रेमप्रकरणं…! (From Reena, Kiran To Fatima: 2 Broken Marriages, 6 Affairs, Here is A Sneak Peek at Aamir Khan’s Love Life)

आमिर खान आणि किरण राव या उभयतांनी आपल्या काडीमोडाची बातमी पत्रकाद्वारे घोषित केल्यापासून, आमिर खान खूपच चर्चेत आला आहे. ‘हा घटस्फोट म्हणजे काही शेवट नाही. नवीन प्रवासाची सुरुवात आहे,’ असे आमिरने पत्रकात नमुद काय केले, आमिर आता पुढे काय करणार आहे, असा लोकांना प्रश्न पडला आहे. एवढंच नव्हे तर आमिर नव्या नात्याच्या शोधात तर नाही ना? किंवा त्याने आधीच नवीन साथीदार शोधला आहे, असं समजायचं का? अशा नाना शंका लोक काढत आहेत. दंगल फेम अभिनेत्री फातिमा सना शेखसोबतही त्याचं नाव जोडलं जात आहे. शिवाय त्यांच्या घटस्फोटालाही फातिमाच जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे.

तसं पाहिलं तर बॉलिवूडच्या या परफेक्शनिस्ट म्हटले जाणाऱ्या अभिनेत्याचे खाजगी आयुष्य कधीच परफेक्ट नव्हतं. आमिरचे अनेक मुलींसोबत नाव जोडले गेले आहे. जाणून घेऊया आमिर खानच्या प्रेमप्रकरणांचे किस्से…

रिना दत्ताला आमिरने रक्ताने प्रेम पत्र लिहिले होते

आमिरच्या प्रेमप्रकरणांमध्ये रिना दत्ताचं नाव येणार नाही, असं होणार नाही. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच आमिरने रिनासोबत लग्न गेलं होतं. रिना त्याच्या घराच्या समोरच राहत होती आणि आमिर तिच्या प्रेमात इतका बुडाला होता की त्याने तिला रक्ताने प्रेम पत्रही लिहिले होते. धर्माचा विचार न करता त्या दोघांनी १९८६ ला लग्न केले, परंतु दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. आमिरचे सतत दुसऱ्या मुलींसोबत नाव जोडले जात असल्याने ती कंटाळली होती.  याच कारणामुळे पुढे त्यांचा घटस्फोट झाला.

‘दिल है कि मानता नहीं’ च्या वेळेस पूजा भट्ट आवडू लागली

१९९१ मध्ये आमिर खान आणि पूजा भट्ट यांच्यातील प्रेमप्रकरणही बरेच चर्चिले गेले. रिना दत्तासोबतचे आमिरचे संबंध बिघडत असताना आमिरला पूजा भट्ट आवडू लागली. दोघांमध्ये ‘दिल है कि मानता नहीं’ चित्रपटाच्या दरम्यान जवळीक निर्माण झाली होती. पंरतु त्यावेळेस आमिरचं लग्न झालेलं होतं आणि पूजाचे वडील महेश भट्ट हा चित्रपट बनवत होते. दोघांमधील ऑनस्कीन केमिस्ट्री दर्शकांनी खूपच पसंत केली अन्‌ खऱ्या आयुष्यातही ही केमिस्ट्री जुळून आली होती. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण यांच्या दोघांच्या प्रेमप्रकरणाबाबत फार कुणाला कळलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी देखील आपलं प्रेमप्रकरण वाढवलं नाही आणि आपापला वेगळा मार्ग धरला.

विदेशी जर्नलिस्ट जेसिका हाइन्ससोबतही लिव्ह इनमध्ये राहिला आमिर

१९९८ मध्ये ‘गुलाम’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान परदेशी पत्रकार जेसिका हाइन्सच्या आकंठ प्रेमात बुडाले परफेक्शनिस्ट आमिर खान. दोघं लिव्ह – इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते. दरम्यान जेसिकाला दिवसही गेले होते. तेव्हा आमिरला मूल नको होते, परंतु जेसिकाला ते पटले नाही. त्यांच्यातील वाद वाढला नि जेसिका लंडनला निघून गेली, त्यानंतर तिने तेथेच एका मुलाला जन्म दिला. असं म्हणतात की, आमिर आणि जेसिकाचा मुलगा जॉन हुबेहुब आमिरसारखा दिसतो.  

प्रिटी झिंटासोबतचं अफेअर बनलं रिनाला घटस्फोट देण्याचं कारण

प्रिटी झिंटासोबतच्या आमिर खानच्या प्रेमप्रकरणाची खूप चर्चा झाली होती. २००२ मध्ये रिना दत्ता आणि आमिर खान विभक्त झाले, त्यावेळेस प्रिटी झिंटाला दोषी ठरवले गेले होते. त्या दोघांनी गुपचुप लग्न केलं असल्याचे देखील म्हटले गेले होते. परंतु प्रिटीने, आमिर आणि मी फक्त चांगले मित्र आहोत, असं सांगून या चर्चांना फुलस्टॉप दिला होता. 

घटस्फोटानंतर किरण राववर आमिर भाळला

रिना दत्ताला घटस्फोट दिल्यानंतर लगानच्या शूटिंग दरम्यान आमिरच्या आयुष्यात किरण राव आली. आणि आमिर तिला भाळला. काही काळ लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर दोघांनी २००६ मध्ये लग्न केले. सरोगसी पद्धतीने ते दोघे आझाद नावाच्या मुलाचे पालकही बनले. असे असून देखील आमिरचं मन भरलेलं दिसत नाही.

दंगल गर्ल फातिमा बनली हृद्याची धडकन

आमिर-किरण आता विभक्त झाले आहेत आणि आत्ता त्यांच्यातील काडीमोडास फातिमा सना शेखला कारणीभूत ठरवले जात आहे. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ‘दंगल’ गर्ल फातिमा सोबत आमिरच्या अफेयरच्या खबरा प्रसिद्ध झाल्या होत्या. अनेकदा दोघांना हातात हात घालून फिरताना पाहिलं गेलं होतं. चित्रपटाच्या शूटिंग पूर्वीच फातिमा आणि आमिर एकमेकांना डेट करत होते. फातिमाला चित्रपटात घेण्यासाठी आमिरने निर्मात्यांवर दबाव आणला होतो असेही म्हटले गेले. परंतु त्यावेळेस फातिमाने पहिल्यांदाच आपलं मौन सोडत असं म्हटलं होतं की, सुरुवातीला मला अशा गोष्टींचा त्रास होत असे, परंतु आता अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यास मी शिकले आहे. मी अशा गोष्टींचा पूर्वी कधीही अनुभव घेतला नसल्याने मला वाईट वाटले. अनोळखी माणसं, ज्यांनी मी कधी भेटले नाही, माझ्याबद्दल वाट्टेल ते लिहितात. त्यांना हेही माहीत नाही, की हे खरं आहे की खोटं. आणि या गोष्टी वाचणारे मला वाईट व्यक्ती समजतात. याचा मला त्रास व्हायचा. पण आता मी याकडे दुर्लक्ष करायला शिकली आहे. तरही कधी कधी त्रास होतोच. असेही फातिमा म्हणाली होती.

आता आमिर खानने किरण रावला घटस्फोट दिला आहे. आणि लोकांच्या अंदाजानुसार आमिर लवकरच फातिमासोबतचं आपलं नातं जाहीर करू शकतो. कदाचित कोण जाणो आमिरच्या नव्या प्रवासाची सुरुवात फातिमासोबत व्हायची असेल.