2022 मध्ये या बॉलिवूड कलाकारांनी खरेदी केले नवे...

2022 मध्ये या बॉलिवूड कलाकारांनी खरेदी केले नवे घर (From Ranveer Singh to Janhvi Kapoor, These Bollywood Stars Bought New Home in Year 2022)

डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा महिना आहे. लोकांनी आतापासूनच नवीन वर्षाची तयारी सुरू केली आहे. 2022 हे वर्ष काहींसाठी काही खास नव्हते, तर दुसरीकडे अनेकांसाठी हे वर्ष अनेक अर्थांनी खूप खास ठरले आहे. विशेषतः बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल बोलायचे तर, इंडस्ट्रीतील अनेक जोडप्यांच्या घरी या वर्षात पाळणा हलला आहेत, अनेक जोडप्यांनी लग्नगाठ बांधली आहे, तर अनेक स्टार्सनी या वर्षी स्वत:साठी नवीन घर खरेदी केले आहे. लक्झरी लाइफस्टाइलसाठी प्रसिद्ध असलेल्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी यावर्षी आलिशान घरे खरेदी केली आहेत, चला एक नजर टाकूया त्या स्टार्सवर…

रणवीर सिंह

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह याने यावर्षी मुंबईतील वांद्रे येथील एका पॉश भागात एक आलिशान घर खरेदी केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर आणि दीपिका पादुकोणच्या या घराची किंमत जवळपास 120 कोटी रुपये आहे.

शाहिद कपूर

‘विवाह’ आणि ‘कबीर सिंग’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम करणारा बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरसाठी 2022 हे वर्ष खूप खास ठरले आहे. यावर्षी त्याने मुंबईतील वरळी येथे ८,६२५ स्क्वेअर मीटरचा डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला. शाहिद आणि मीराच्या या घराची किंमत ५९ कोटी रुपये आहे.

जान्हवी कपूर

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. जान्हवीने नुकताच मुंबईतील पाली हिल परिसरात डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीच्या या नवीन घराची किंमत 65 कोटी आहे.

राजकुमार राव

बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता राजकुमार रावने त्याची दीर्घकाळची मैत्रीण पत्रलेखा हिच्याशी लग्न केल्यानंतर 2022 मध्ये मुंबईत स्वत:साठी नवीन घर विकत घेतले आहे. जुहू भागातील हे घर त्याने जान्हवी कपूरकडून विकत घेतल्याचे म्हटले जाते, त्या घराची किंमत 44 कोटी रुपये आहे.

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आपल्या लक्झरी लाइफसाठी ओळखली जाते. 2022 हे वर्ष तिच्यासाठीही खूप खास ठरले आहे. माधुरी दीक्षितने यावर्षी मुंबईच्या लोअर परेलमध्ये एक नवीन घर घेतले आहे, त्या घराची किंमत 48 कोटी रुपये आहे.

अमिताभ बच्चन

मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याकडे अनेक आलिशान घरे असली तरी यावर्षी त्यांनी नवीन घर घेतले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी चार बंगला भागात 12,000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असलेला आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.

अंकिता लोखंडे

टीव्ही मालिका ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘मणिकर्णिका’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवणारी अंकिता लोखंडेने प्रियकर विकी जैनसोबत गेल्या वर्षीच लग्नगाठ बांधली. या वर्षी या जोडप्याने मुंबईत एक आलिशान 8 BHK फ्लॅट खरेदी केला. अंकिता आणि विकी आपल्या नवीन घरात शिफ्ट झाल्याचं सांगण्यात येत आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम