सलमान खान आणि रणबीर कपूर यांनी आपली माजी प्रेयस...

सलमान खान आणि रणबीर कपूर यांनी आपली माजी प्रेयसी कतरिना कैफला रेंज रोव्हर कार आणि हिऱ्यांचा नेकलेस असा करोडो रुपयांचा केला आहेर (From Range Rover To Diamond Necklace, Katrina Kaif’s Exes Salman Khan And Ranbir Kapoor Send Crores Of Gifts To Katrina On Her Wedding)

सध्या सर्वाधिक चर्चिलं जर काही जात असेल तर ते आहे कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांचं लग्न. म्हणजे अगदी लग्न करायचं ठरवल्यापासून ते लग्न झाल्यानंतरही कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे ते चर्चिलं जात आहे. कॅट आणि विकीच्या राजेशाही लग्नाच्या थाटाने सगळ्यांना चांगलच मोहवून टाकलं आहे. सर्व जण नवविवाहित जोडप्यास शुभेच्छा तसेच आशीर्वादही देत आहेत. शिवाय मित्र, सहकलाकार आणि जवळच्या व्यक्तींकडून उभयतांस महागड्या भेटवस्तू आहेरात मिळाल्या आहेत.

Katrina Kaif

कॅट आणि विकी यांचा शाही विवाह ९ डिसेंबरला कडक बंदोबस्तात पार पडला. दोघांनी आपल्या माजी प्रियकर –प्रेयसीस बोलावले नाही. तरी या प्रेमींनी आपल्या माजी प्रेयसीवर भरघोस खर्च केला आहे. सगळ्यात महागडी भेटवस्तू देण्यामध्ये दबंगफ्रेम सलमानने पहिला नंबर लावला आहे. त्याने आपली जवळची मैत्रिण अन्‌ माजी प्रेयसी कतरिनाला तीन करोडची रेंज रोव्हर कार आहेर म्हणून दिली आहे, असे समजते.

Katrina Kaif

तर कॅटच्या आणखी एका माजी प्रियकराने अर्थात रणबीर कपूरने तिला हिऱ्यांचा नेकलेस भेट केला आहे. ज्याची किंमत २.७ करोड इतकी आहे. याशिवाय कॅटची मैत्रिण आणि रणबीरची गर्लफ्रेंड आलियाने तिला लाखोंचे परफ्युम्स भेट केले आहेत.

Katrina Kaif

कतरिनाप्रमाणेच विकीलाही महागडा आहेर मिळाला आहे. हृतिक रोशनने विकी कौशलला तीन लाखाची बीएमडब्लू बाईक दिली आहे. तर शाहरूखने दीड लाखाची एक पेंटिंग भेट म्हणून विकीला दिली आहे.

Katrina Kaif

अनुष्का शर्माने कॅटला ६.४ लाखाची हिऱ्याची इयर रिंग्स दिली आहे. तर तापसी पन्नूने आपला मित्र विकीला प्लॅटिनमचं ब्रेसलेट आहेर केलं आहे, ज्याची किंमत १.४ लाख इतकी आहे.

फोटो सौजन्य – सर्व फोटो इन्स्टाग्राम