प्रियंका ते ऐश्वर्या, या बॉलिवूड तारकांचे सौंदर...

प्रियंका ते ऐश्वर्या, या बॉलिवूड तारकांचे सौंदर्यप्रसाधन आहे दही; बघुया त्यांच्या सौंदर्याचे गुपित (From Priyanka To Aishwarya Rai, These Bollywood Beauties Swear By Yogurt For Good Skin, Know Their Secret Beauty Recipes )

बॉलिवूडच्या या सुंदर तारकांचं आवडतं सौंदर्यप्रसाधन आहे दही. म्हणजे दही आणि दह्यापासून बनवलेले फेस मास्क वापरून त्या आपलं सौंदर्य टिकवून ठेवतात. दह्यापासून बनवलेला मास्क आपल्या त्वचेला तजेदार राखतो.

ऐश्वर्या राय बच्चन

सर्वाधिक सुंदर असलेली ऐश्वर्या राय बच्चन आपलं रुप आणि सुंदर त्वचेबद्दल ओळखली जाते. आपल्या या त्वचेचं सौंदर्य राखण्यासाठी ती जास्त करून घरगुती जिन्नस वापरते. फेसपॅक म्हणून ती दही वापरते. हे दही आपली त्वचा आर्द्र आणि तरुण राखते, असं तिनं कबूल केलं आहे. आता तुम्हाला सुद्धा ऐश्वर्यासारखी नितांतसुंदर त्वचा राखायची असेल तर घरगुती दही वापरायला हरकत नाही.

प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा दही डोक्यात घालते. अर्थात्‌ ती आपल्या मुलायम, चमकदार केसांना दही लावते. तिच्या मजबूत आणि मुलायम केसांचं हे गुपित आहे. अंडं आणि मध दह्यामध्ये मिसळून ती केसांना लावते. त्यामुळे तिचे केस मजबूत होतात. शिवाय डोक्यातील त्वचा कोरडी पडत नाही, अन्‌ कोंडा देखील होत नाही.

कियारा अडवाणी

कियारा अडवाणी सारखी नितळ आणि सतेज त्वचा, आपली असावी, असं प्रत्येक तरुणीला मनातून वाटत असणार. तसं पाहिलं तर कियारा लॅक्टोज्‌ इनटॉलरंट आहे. तरीपण त्वचेचं पोषण करण्यासाठी ती दही वापरते. म्हणजे दही आणि बेसन यांचं मिश्रण चेहऱ्यावर लावते.

सुरभी ज्योती

टी.व्ही.ची ‘नागिन बेला’ म्हणजेच ज्योती सुरभी हिच्या सुंदर त्वचेचं रहस्य दहीच आहे. तिनं आपल्या चाहत्यांसाठी दह्याचा फेस पॅक शेअर केला आहे. सुरभीच्या पद्धतीचा फेस पॅक बनविण्यासाठी दीड टेबलस्पून हळद, १-१ टेबलस्पून बेसन, व्हिट ब्रान दह्यात मिसळा. या मिश्रणात ३-४ थेंब गुलाबपाणी घाला. हे मिश्रण चेहऱ्याला लावा नि सुकल्यावर चेहरा स्वच्छ धुवा.

अनन्या पांडे

आपली त्वचा चमकदार आणि निरोगी राखण्यासाठी अनन्या पांडे घरगुती जिन्नस वापरते. पण तिचं सर्वात आवडतं आहे दह्याचा फेस पॅक. हा फेस पॅक तयार करण्यासाठी ती १ टीस्पून हळद, १ टीस्पून मध आणि १ टेबलस्पून दही एकत्र करते. अन्‌ हे मिश्रण चेहऱ्यावर लावते. तुम्ही हे करा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवा.

मीरा राजपूत

शाहीद कपूरची बायको मीरा राजपूतच्या त्वचेची लोक तारीफ करतात. आपण आपल्या त्वचेची निगा कशी राखतो, त्याचे उपाय व घरगुती फेस पॅक्स ती सोशल मिडियावर नित्यनेमाने शेअर करत असते. मीरा कधीच फेशियल करून घेत नाही. ती घरीच ४ स्टेप ग्लो फेशियल करते. त्यासाठी दही आणि बेसन वापरते.