प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण व इतर अभिनेत्री...

प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण व इतर अभिनेत्रींच्या बोटात करोडो रुपयांच्या अंगठया (From Priyanka Chopra To Deepika Padukone These Actresses Wear Expensive Rings)

बॉलिवूड अभिनेत्री व  त्यांचे पती यांच्याकडे आता अमाप संपत्ती असल्याने त्यांचे शौक देखील तितकेच महागडे आहेत. आपण थक्क होऊ, अशा त्यांच्या दागिन्यांच्या किंमती  आहेत. बॉलिवूड मधील या ५ अभिनेत्रींनी त्यांच्या साखरपुडयाला  घातलेल्या या आहेत करोडो रुपयांच्या अंगठया 

ऐश्वर्या राय बच्चन

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
बॉलिवूड मधील सर्वात सुंदर तारका ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न ठरविले तेव्हा कितीतरी आशिकांच्या दिलाचे तुकडे तुकडे झाले असतील. अभिषेकने या  ऐश्वर्याला साखरपुडयाच्या दिवशी ५३ कॅरेटची सॉलिटेयर रिंग घातली होती. त्याची किंमत ५० लाख रुपये होती.
सोनम कपूर

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
बॉलिवूडची सर्वात स्टायलिश अभिनेत्री सोनम कपूरने प्रसिध्द उद्योगपती आनंद आहुजाशी लग्न केलं. हाती आलेल्या वृत्तानुसार आहुजाने त्यांच्या साखरपुडयाला सोनमला जी अंगठी घातली होती, तिची किंमत ९० लाख रुपये आहे.
अनुष्का शर्मा

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
अभिनेत्री अनुष्का शर्मा व क्रिकेटवीर विराट कोहली , यांनी साता समुद्रापार केलेले लग्न चांगलेच गाजले.  विराटने आपली प्रिय पत्नी अनुष्का हिला घातलेल्या एंगेजमेन्ट रिंगची किंमत १ कोटी रुपये आहे.
प्रियांका चोप्रा

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
बॉलिवूड मधून हॉलिवूडमध्ये गेलेल्या प्रियांका चोप्राचे सगळेच काम हटके असते. तिनं अमेरिकन गायक निक जोनास शी केले जे खूप गाजले. या परदेशी बाबू निकने प्रियंकाला जी एंगेजमेन्ट  रिंग घातली, तिची किंमत १ कोटी ४० लाख रुपये होती.
दीपिका पदुकोण

फोटो सौजन्य : इंस्टाग्रामबॉलिवूडची सर्वात सुंदर आणि हिट जोडी आहे. रणवीर सिंह – दीपिका पदुकोण ! रणवीर या दीपिकावर इतका फिदा झाला आहे की , त्याने आपल्या प्रियतमेला जी एंगेजमेन्ट  रिंग दिली, तिची किंमत २ कोटी ७ लाख रुपये आहे. ही  किंमत उघड होताच लोकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती.