सावळा रंग असूनही या अभिनेत्रींनी गाजवली टीव्ही ...

सावळा रंग असूनही या अभिनेत्रींनी गाजवली टीव्ही इंडस्ट्री (From Nia Sharma to Sakshi Tanwar, These Actresses Became Very Popular on TV Despite Their Dark Complexion)

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनेत्रींच्या सौंदर्य आणि वर्णाला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. अनेकदा चेहऱ्याचा रंग हा अभिनेत्रींच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा अडथळा ठरतो, पण या प्रकाराला अपवाद ठरत अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या सावळ्या रंगाने इंडस्ट्रीत नाव आणि प्रसिद्धी मिळवली आहे. छोट्या पडद्याबद्दल बोलायचे झाले तर इथे अनेक सावळ्या अभिनेत्रींनी आपल्या टॅलेंटच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

निया शर्मा

टीव्हीची सुंदर नागिन निया शर्मा हिला सर्वचजण ओळखतात. स्ट्रगलच्या दिवसांमध्ये, निया शर्माला आपल्या सावळ्या रंगामुळे अनेकदा नकारांना सामोरे जावे लागले होते, परंतु आपल्या टॅलेंटच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली निया अनेकदा आपल्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.

साक्षी तन्वर

‘कहानी घर घर की’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ सारख्या मालिकांमध्ये काम केलेल्या साक्षी तन्वरने छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. सावळ्या रंगाच्या साक्षीने आपल्या क्षमतेच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. तिचे नाव टीव्हीच्या सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

राजश्री ठाकूर

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री राजश्री ठाकूरने सावळा रंग असूनही टीव्हीवर खूप नाव कमावले. ‘सात फेरे’ या मालिकेत तिने एका अंध मुलीची भूमिका साकारली होती, त्या भूमिकेमुळे ती प्रत्येक घराघरात लोकप्रिय झाली.

सुंबुल तौकीर

सावळ्या रंगाच्या सुंबुल तौकीरचे नाव छोट्या पडद्यावरील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते.  ‘इमली’ या टीव्ही मालिकेतील तिच्या दमदार व्यक्तिरेखेमुळे तिला घरोघरी ओळख मिळाली. सध्या सुंबूल सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ मध्ये दिसत आहे.

दीपिका सिंग

‘दिया और बाती हम’ या हिट मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी दीपिका सिंग ही एक यशस्वी टीव्ही अभिनेत्री मानली जाते. मात्र तिलाही तिच्या सावळ्या रंगामुळे काही फरक पडत नाही, हेही तिने सिद्ध केले आहे.

पारुल चौहान

टीव्ही सीरियल ‘बिदाई’मध्ये दिसलेली अभिनेत्री पारुल चौहान आपल्या सावळ्या रंगामुळे खूप अडचणीत आली होती. मात्र आपल्या टॅलेंटमुळे तिने इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या यशासमोर तिचा रंग कधीच अडथळा ठरला नाही.