मौनी रॉय पासून ते तेजस्वी प्रकाशपर्यंत नागिन बन...

मौनी रॉय पासून ते तेजस्वी प्रकाशपर्यंत नागिन बनण्यासाठी या अभिनेत्रींनी घेतली होते एवढे मानधन (From Mouni Roy to Tejaswi Prakash, know The Fees of Naagin Actresses)

टीव्ही क्वीन एकता कपूरचा लोकप्रिय शो ‘नागिन’चा प्रत्येक सीझन प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय ठरला आहे. सध्या ‘नागिन’चा सहावा सीझन सुरू आहे, या सीझनमध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रकाश नागिणीच्या भूमिकेत दिसत आहे. याआधी मौनी रॉय, सुरभी ज्योती, सुरभी चंदना, निया शर्मा आणि करिश्मा तन्ना यांसारख्या अनेक अभिनेत्री नागिणीच्या भूमिकेत दिसल्या आहेत. मात्र,ही भूमिका साकारण्यासाठी या अभिनेत्रींनी एकता कपूरकडून भरमसाठ फी वसूल केली आहे. मौनी रॉयपासून तेजस्वी प्रकाशपर्यंत या अभिनेत्रींना नागिण बनण्यासाठी किती फी घेतली ते जाणून घेऊया.

मौनी रॉय

टीव्ही क्वीन एकता कपूरने मौनी रॉयला तिची पहिलूी नागिण बनवली होती. पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये मौनी रॉय नागिणच्या भूमिकेत दिसली, मौनी केलेली नागिणीची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. या मालिकेमुळे मौनी रॉयच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली होती. या शोमध्ये मौनी रॉयला एका दिवसाच्या शूटसाठी 2 लाख रुपये फी मिळत होती असे म्हटले जाते.

सुरभि ज्योति

टीव्हीवरील सुंदर अभिनेत्री सुरभि ज्योति नागिनच्या तिसऱ्या सीझनमध्ये मुख्य भूमिकेत दिसली, ज्यामध्ये तिने बेलाची भूमिका साकारून लोकांची मने जिंकली. सुरभी ज्योतीच्या फीबद्दल बोलायचे झाले तर, त्या वेळी ती एका दिवसाच्या शूटिंगसाठी 60 हजार रुपये फी घेत होती.

करिश्मा तन्ना

‘नागिन 3’मध्ये सुरभि ज्योतिशिवाय करिश्मा तन्नाही नागिन रुहीच्या भूमिकेत दिसली होती. खरं तर करिश्मा आणि सुरभिची व्यक्तिरेखा एकच होती. शोच्या सुरुवातीला, करिश्मा तन्नाचा चेहरा सुरभी ज्योतीत बदलतो असे दाखवले होते. नागिन या मालिकेच्या एका दिवसाच्या शूटिंगसाठी करिश्माने ५० हजार रुपये फी घेतली होती.

अनिता हसनंदानी

नागिन मालिकेच्या अनेक सीझनमध्ये अभिनेत्री अनिता हसनंदानीने नागिणीची भूमिका केली होती. त्यामुळे या मालिकेची सर्वात लोकप्रिय नागिण म्हणून तिला ओळखले जाते. मिळालेल्या माहितीनुसार ती एका एपिसोडसाठी ५० हजार रुपये फी घ्यायची.

निया शर्मा

 ‘नागिन 4’ बद्दल बोलायचे झाल्यास त्यात अभिनेत्री निया शर्मा नागिण झाली होती. एकता कपूरच्या या हिट शोचा हा सीझन प्रेक्षकांना फारसा आवडला नसला तरी नियाचा लूक मात्र सगळ्यांच्याच मनावर मोहिनी घालत होता. रिपोर्ट्सनुसार, निया नागिन बनण्यासाठी एका दिवसाची फी म्हणून 40 हजार रुपये घेत होती.

सुरभि चंदना

‘नागिन 5’मध्ये सुरभि चंदना मुख्य भूमिकेत होती. या सीझनमध्ये अभिनेत्रीचा नागिण अवतार सर्वांनाच आवडला होता. यासाठी सुरभिला भरमसाठ फीही देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सुरभि चंदना एका एपिसोडसाठी सुमारे 1 लाख 20 हजार रुपये घेत होती.

हिना खान

हिना खान ‘नागिन 5’ च्या फक्त तीन एपिसोडमध्ये दिसली असली तरी तिने तिच्या लूक आणि अभिनयाने प्रेक्षकांना तिचे चाहते बनवले होते. हिनाने त्या नागिण अवतारासाठी भरघोस फी देखील घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्रीने नागिणीची भूमिका करण्यासाठी दीड ते दोन लाख रुपये फी मागितली होती.

तेजस्वी प्रकाश

‘बिग बॉस 15’ ची विजेती तेजस्वी प्रकाशने नागिण बनून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तेजस्वी ‘नागिन 6’ मध्ये दिसत आहे. एकताने या सीझनसाठी जवळपास 130 कोटी पणाला लावले आहेत, मात्र अद्याप तेजस्वीच्या फीचा खुलासा करण्यात आलेला नाही, मात्र मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वीला नागिणीची भूमिका करण्यासाठी मोठी रक्कम दिली जात आहे.