ओठांची सर्जरी ते मित्रांचा वापर करणारी, असे आरो...

ओठांची सर्जरी ते मित्रांचा वापर करणारी, असे आरोप झालेली मौनी रॉय (From Lip Surgery To Using A Friend, There Are Many Allegation Against Mouni Roy)

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय सध्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मौनी हिने या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली असली तरी तिच्या कामाचे खूप कौतुक केले जात आहे. टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत मौनीने आपली खास ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक कलाकाराप्रमाणेच मौनी रॉयही अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आज आम्ही तुम्हाला मौनीवर लागलेल्या काही आरोपांबद्दल सांगणार आहोत.

जेव्हा मौनी रॉय आपल्या ओठांवर शस्त्रक्रिया करून मीडियासमोर आली तेव्हा सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले. लोकांना मौनीचे नवीन ओठ अजिबात आवडले नाहीत. त्यामुळे सर्वांनी तिच्यावर खूप टीका केली.पण जेव्हा मौनीला त्या शस्त्रक्रियेबद्दल विचारण्यात आले तेव्हा मात्र तिने ती अफवा असल्याचे सांगितले.

मध्यंतरी मौनी रॉय नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत आगामी ‘बोले चुडिया’ या चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात होते. पण मौनीचे वागणे या चित्रपटाच्या निर्मात्यांना थोडे खटकले त्यामुऴे त्यांनी तिला बाहेरचा रस्ता दाखवला.

अभिनेता अमित तंडने आपली पत्नी रूबी तंडनचा मौनी हिने वापर करुन घेतल्याचा आरोप लावला होता. तेव्हा त्याने तो कधीच मौनीचा चेहरा सुद्धा पाहणार नाही असे म्हणाला होता.

मौनी रॉयने 2006 मध्ये एकता कपूरची प्रसिद्ध मालिका ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेत ती कृष्णा तुलसीच्या भूमिकेत दिसली होती.

केवळ टीव्ही आणि बॉलिवूडच नाही तर मौनी रॉयने पंजाबी चित्रपट ‘हीरो हिटलर इन लव्ह’मध्येही काम केले होते. मौनी रॉयने 27 जानेवारी 2022 ला दुबई स्थित उद्योगपती सूरज नांबियारशी लग्न केले. दोघांही लग्नाआधी अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते.