2022 मध्ये या प्रसिद्ध व्यक्तींनी घेतला जगाचा न...

2022 मध्ये या प्रसिद्ध व्यक्तींनी घेतला जगाचा निरोप (From Lata Mangeshkar to Raju Srivastava, These Famous Celebrities Died in Year 2022)

दोन वर्षे कोरोना विषाणूचा सामना केल्यानंतर 2022 या वर्षात लोकांना या महामारीपासून थोडा दिलासा मिळाला. बॉलिवूड इंडस्ट्रीत पुन्हा एकदा पूर्ववत सुरु होऊ लागली, पण या वर्षाने अनेक प्रसिद्ध व्यक्तींनाही आपल्यापासून दूर केले. 2022 मध्ये मनोरंजन सृष्टीशी संबंधित अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी या जगाचा कायमचा निरोप घेतला, त्यामुळे चित्रपटसृष्टीसह सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला.

लता मंगेशकर

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे या वर्षी ६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह अनेक बॉलिवूड तारे आणि चाहते त्यांच्या अंतिम दर्शनाला उपस्थित होते.

राजू श्रीवास्तव

आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी यावर्षी २१ सप्टेंबर रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. जिममध्ये व्यायाम करताना ते पडले, त्यानंतर त्यांच्या छातीत दुखत होते म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एम्समध्ये साधारण महिनाभर उपचार घेऊनही त्यांचे निधन झाले.

बप्पी लाहिरी

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांनीही 2022 मध्ये या जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, 16 फेब्रुवारीला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामुळे त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय त्यांना अनेक आजारांनी ग्रासल्याचे सांगितले जाते.

के.के.

बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्ण कुमार कुन्नाथ म्हणजेच केके यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी ३१ मे २०२२ रोजी अखेरचा श्वास घेतला.  गुरुदास महाविद्यालयात नझरूल मंच येथे चालू कार्यक्रमातात त्याची तब्येत बिघडली. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर तो बेशुद्ध झाला, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पंडित बिरजू महाराज

भारतीय नृत्य-संगीत जगताचे जिवंत महापुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंडित बिरजू महाराज यांनीही २०२२ मध्ये या जगाचा निरोप घेतला. ८३ वर्षीय बिरजू महाराज यांची किडनी निकामी झाली होती. ते खूप काळ डायलिसिसवर होते. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांनी १७ जानेवारी रोजी अखेरचा श्वास घेतला.

अरुण बाली

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे ७ ऑक्टोबर रोजी निधन झाले. आपल्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या. अरुण बाली सर्वात शेवटी अमिताभ बच्चन, नीतू कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबत ‘गुडबाय’ चित्रपटात दिसले होते.

सिद्धांत सूर्यवंशी

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांनीही खूप कमी वयातच या जगाचा निरोप घेतला. जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत. ‘कुसुम’, ‘वारीस’ आणि ‘सूर्यपुत्र कर्ण’ यांसारख्या अनेक उत्तम मालिकांमध्ये तो दिसला होता.