नागिन फेम निया शर्मा या वादांमुळे आली होती चर्च...

नागिन फेम निया शर्मा या वादांमुळे आली होती चर्चेत (From Kissing a Friend on Lip to Cutting a Vulgar Cake, When Nia Sharma Came In Headlines Due to These Controversies)

टीव्हीवरील सुंदर आणि ग्लॅमरस ‘नागिन’ म्हणून प्रसिद्ध असलेली निया शर्मा अनेकदा तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. नियाच्या चाहत्यांना तिचे फोटो फार आवडतात. पण काहीजण तिला ट्रोलसुद्धा करतात. मात्र निया या ट्रोलिंगकडे फारसे लक्ष देत नाही. निया अनेकदा अभिनयापेक्षा इतर वादांमुळेच जास्त चर्चेत असते. आज आम्ही तुम्हाला निया शर्माच्या काही वादांबद्दल माहिती देणार आहोत.

निया शर्माने ‘एक हजारों में मेरी बेहना है’, ‘जमाई राजा’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. मालिकांशिवाय ती काही रिअॅलिटी शोमध्ये सुद्धा दिसली आहे. नियाने ‘खतरों के खिलाडी’ ते ‘झलक दिखला जा’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे.

टीव्ही मालिका आणि रिअॅलिटी शो सोबतच नियाने वेब सिरीजमध्येही काम केले आहे. वेब सिरीजमध्ये बोल्डनेसचे प्रदर्शन केल्यामुळे ती आणखी प्रसिद्धीच्या झोतात आलेली. मात्र लोकप्रियतेसोबतच ती अनेक वादाच्या भोवऱ्यात सापडली, ज्यामुळे ती आणखी चर्चेत आली.

मध्यंतरी नियाने आपली मैत्रीण रेहाना मल्होत्राच्या ओठांचे सर्वांसमोर चुंबन घेतले होते. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले होते. याव्यतिरिक्त ती वाढदिवसाला अश्लील केक कापल्यामुळे सुद्धा चर्चेत आली होती. त्या केकमुळे लोकांनी तिची खूप कानउघडणी केली होती.

नियासंबंधित वादांची यादी इथेच संपत नाही. निया शर्माने ‘ट्विस्टेड’ या वेब सिरीजमध्ये बोल्ड सीन्स दिले होते. या सिरीजमध्ये तिने लेस्बियन मुलीची भूमिका साकारली होती आणि तिच्या सह-अभिनेत्रीसोबत ऑनस्क्रीन बोल्ड सीन्स दिले होते. या सीन्समुळे खूप गोंधळ निर्माण झाला होता.

निया शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. तसेच 7 दशलक्षाहून अधिक लोक तिला फॉलो करतात. अभिनेत्री अनेकदा आपल्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते.

फोटो सौैजन्य – इन्स्टाग्राम