कतरीना कैफ ते अनुष्का शर्मा यांनी आपला हनीमून य...

कतरीना कैफ ते अनुष्का शर्मा यांनी आपला हनीमून या स्थळांवर साजरा केला होता…(From Katrina To Anushka Sharma, These Stars Went For Honeymoon In These Beautiful Places)

बॉलिवूडच्या सिताऱ्यांची जीवनशैली फारच ऐषारामाची असते, हे आपण ओळखून आहोत. त्यामुळे त्यांच्या खासगी जीवनाबद्दल सर्वसामान्यांना कमालीचे औत्सुक्य असते. ते शमविण्याचा हा एक प्रयत्न. काही बिनीच्या कलाकारांनी आपला हनीमून कोणत्या स्थळांवर साजरा केला होता, ते बघा.

कतरीना कैफ – विकी कौशल

या जोडप्याने गेल्या वर्षी, डिसेंबरात राजस्थानातील एका आलिशान हॉटेलात लग्न केलं होतं. लग्नानंतर हे दोघे मालदीव बेटांवर, हनीमून साजरा करायला गेले होते. बॉलिवूडच्या कलाकारांना या निसर्गरम्य, समुद्राने वेढलेल्या पर्यटन स्थळाचे भारीच आकर्षण आहे.

शिल्पा शेट्टी – राज कुंद्रा

शिल्पा शेट्टीने याच नोव्हेंबर महिन्यात, २००९ साली बिझनेसमन राज कुंद्राशी लग्न केले होते. लग्नाआधी ते दोघे बराच काळ डेटिंग करत होते. त्यांनी लग्न धूमधडाक्यात केले. हनीमूनसाठी मात्र त्यांनी बहामा बेटांची निवड केली होती.

अनुष्का शर्मा – विराट कोहली

अनुष्काने क्रिकेटवीर विराट कोहलीशी २०१७ साली डिसेंबरात लग्न केलं. सगळ्यांपासून लपवून ठेवत त्यांनी काही जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत इटलीमध्ये लग्न केलं होतं. नंतर भारतात परतल्यावर दिल्ली व मुंबई अशा दोन ठिकाणी रिसेप्शन ठेवलं होतं. त्यानंतर त्यांनी हनीमूनसाठी फिनलॅन्डची निवड केली होती.

करीना कपूर – सैफ अली खान

बराच काळ एकमेकांना डेट करत करीना कपूर व सैफ अली खान यांनी २०१२ साली लग्न केलं. महिना होता ऑक्टोबरचा. लग्नानंतर त्यांनी हनीमूनासाठी स्वित्झर्लंड मधील गस्ताद हे ठिकाण पसंत केलं होतं.

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन

स्वरूपसुंदर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन २००७ साली विवाहबद्ध झाले होते. त्यांचा विवाह इतका गाजला होता की, नंतर बरेच दिवस लोक त्याची चर्चा करत होते. लग्नानंतर हनीमूनसाठी त्यांनी युरोपचे पर्यटन केले होते.

( सर्व फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)