लग्नसमारंभात नाचगाणी करण्यासाठी कतरिना कैफ ते स...

लग्नसमारंभात नाचगाणी करण्यासाठी कतरिना कैफ ते सलमान खान किती पैसे घेतात? माहीत आहे का? (From Katrina Kaif To Salman Khan : Know The Fee These Stars Take For Performance In Wedding)

बॉलिवूडचे सितारे, सिनेमात काम करून करोडो रुपये कमावतात. त्याशिवाय इतर कामातूनही ते उत्तम कमाई करतात. खासगी प्रसंगांमध्ये, दुकाने-मॉल्स्‌ यांच्या उद्घाटन समारंभांमध्ये त्यांना पाचारण करण्यात येते. त्यासाठी ते जबरी किंमत वसूल करतात. काही जण तर कोट्यवधी रुपये घेतात, अशी खबर आहे. कतरिना कैफ ते सलमान खान वगैरे सितारे बड्या श्रीमंतांच्या  लग्नसमारंभात नाचगाणी करण्याची सुपारी घेतात आणि त्यासाठी बक्कळ पैसे घेतात.

कतरिना कैफ

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणून प्रसिद्धी पावलेली कतरिना सिनेमात काम करण्याचे भरपूर मानधन घेते. पडद्यावर तिचे नृत्य पाहून खासगी समारंभात तसंच नाचगाणी करण्याची सुपारी तिला दिली जाते. त्यासाठी ती जवळपास साडेतीन कोटी रुपये घेते.

सलमान खान

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सलमान खानने लग्न केले नाही. पण दुसऱ्यांच्या लग्नात आनंदाने नाचतो. या नाचगाण्यासाठी सल्लूभाई जवळपास २ कोटी रुपयांची सुपारी घेतो.

दीपिका पादुकोण

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

दीपिका पादुकोणचा चाहतावर्ग मोठा आहे. तिच्या रूपगुणांनुसार ती सिनेमात काम करण्याची मोठी फी घेते. अन्‌ खासगी समारंभात सामील होण्यासाठी १ कोटी रुपये तरी घेतेच.

रणवीर सिंह

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

आता दीपिका पादुकोणचा नवरा म्हणून ओळखला जाणारा रणवीर सिंह तसाच हसतखेळत आणि नेहमीच्या उत्साहाने खासगी लग्नसमारंभात नाचगाणी करतो. त्यासाठी २ कोटी रुपये घेतो.

प्रियंका चोप्रा

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

देसी गर्ल प्रियंका चोप्रा आता हॉलिवूडची पण कलाकार झाली असल्याने तिचा खासगी लग्नसमारंभात भाग घेण्याचा भाव वधारला आहे. ती इशा अंबानीच्या लग्नात सहभागी झाली. अशा समारंभात भाग घेण्यासाठी ती २.५ कोटी रुपये आकारते.

रणबीर कपूर

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

चॉकलेटी बॉय रणबीर कपूरचा चाहतावर्ग जास्त करून महिलांचा आहे. सिनेमात काम करण्याचे तो कोट्यवधी रुपये घेतो. त्याचप्रमाणे लग्नात नाचगाणी करण्यासाठी २.५ कोटी रुपये घेतो.

शाहरूख खान

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

मोठे समारंभ आणि पार्टी याच्यात मिसळणारा शाहरूख खान त्या कार्यक्रमाची शान समजला जातो. तो किंग खान असल्याने लग्नात नाचण्यासाठी मोठी रक्कम –  म्हणजे ३.५ कोटी रुपये आकारतो.

हृतिक रोशन

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

देखणा हृतिक रोशन, बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखला जातो. तो जितका चांगला अभिनेता आहे, तितका चांगला डान्सर आहे. त्यामुळे त्याला लग्नात नाचण्यासाठी आमंत्रित केले जाते. मात्र त्यासाठी तो २.५ कोटी रुपये घेतो.