कतरीना कैफ ते नवाजुद्दीन सिद्दीकी, या कलाकारांन...

कतरीना कैफ ते नवाजुद्दीन सिद्दीकी, या कलाकारांनी दुय्यम दर्जाच्या चित्रपटांत कामे केली (From Katrina Kaif to Nawazuddin Siddiqui, These Bollywood Stars Have Worked in B-grade Films)

बॉलिवूडच्या चित्रपटांना ए, बी आणि सी ग्रेड, अशा तीन श्रेणींमध्ये मोजले जाते. ए ग्रेड म्हणजे अर्थातच चांगले चित्रपट – सर्वसाधारण चित्रपट तर बी- ग्रेड म्हणजे दुय्यम दर्जाचे. बॉलिवूडच्या सर्वच सिताऱ्यांना ए ग्रेड चित्रपटात काम करायचे असते, तरी कधी कधी नाईलाजास्तव दुय्यम दर्जाच्या चित्रपटात काम करावे लागते. यामध्ये कतरीना कैफपासून ते नवाजुद्दीन सिद्दीकी पर्यंत कलाकारांची ही मजबुरी राहिली आहे.

अमिताभ बच्चन

महानायक अमिताभ बच्चन म्हणजे एक ग्रेड चित्रपट हे समीकरण आहे. पण त्याला देखील २००३ साली आलेल्या ‘बूम’ या बी ग्रेड चित्रपटात भूमिका करावी लागली होती. जॅकी श्रॉफशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध राखण्यासाठी कदाचित त्याने एक पातळी खाली उतरली असावी.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

मिथुन चक्रवर्ती

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बॉलिवूडचा डिस्को डान्सर म्हणून मिथुन चक्रवर्ती कायमच ए श्रेणीच्या चित्रपटांमधून दिसला आहे. तरी पण तो २००५ साली आलेल्या ‘क्लासिक डान्स ऑफ लव्ह’ या दुय्यम श्रेणीच्या चित्रपटात दिसला होता.

कतरीना कैफ

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

कतरीना कैफने आता उच्च दर्जाच्या चित्रपटाची नायिका म्हणून नाव कमावलं असलं तरी तिची कारकीर्द ‘बूम’ या दुय्यम दर्जाच्या चित्रपटापासून सुरू झाली होती. २००३ साली हा चित्रपट आला होता.

अक्षयकुमार

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अक्षयकुमार देखील आज उत्कृष्ट चित्रपटांचा नायक असला तरी १९९२ साली आलेल्या ‘मिस्टर बॉण्ड’ या चित्रपटात त्याने नायकाची भूमिका केली आहे. हा बी ग्रेड चित्रपट होता.

नवाजुद्दीन सिद्दीकी

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

वैशिष्ट्यपूर्ण चरित्र अभिनेता म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकी आज नावारुपास आलेला आहे. पण सुरुवातीच्या संघर्षाच्या दिवसात त्याला बी-ग्रेड चित्रपटात काम करावे लागले होते. त्यापैकी एक ‘मिस लवली’ होता.

ममता कुलकर्णी

फोटो सौजन्य – फाईल

सुंदर स्मित आणि देखणे रूप लाभलेली ममता कुलकर्णी सर्वच आघाडीच्या नायकांची नायिका झाली होती. तिलाही बी-ग्रेड चित्रपट करावा लागला होता. ‘डिव्हाइन टेंपल खजुराहो’ असं त्या चित्रपटाचं नाव होतं.

मनीषा कोईराला

फोटो सौजन्य – फाईल

रूप आणि अभिनय संपन्न मनीषा कोईरालाने मोठं नाव कमावलं. तिच्याही नशिबी दुय्यम चित्रपट आला होता. २००२ सालच्या ‘एक छोटीसी लव्ह स्टोरी’ नामक चित्रपटात तिने काम केले होते.

शक्ती कपूर

फोटो सौजन्य – फाईल

बॉलिवूडचा सुपरहिट खलनायक आणि विनोदवीर शक्ती कपूरच्या खात्यावर एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट जमा आहेत. पण त्याला देखील काही बी-ग्रेड चित्रपटात कामे करावी लागली होती. ‘मेरी लाइफ में उसकी वाईफ’ हा त्यापैकी एक चित्रपट.